Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती लिहा:
मुद्दे:
(अ) कारणे
(ब) परिणाम
Very Long Answer
Advertisements
Solution
(अ) कारणे:
- १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांचा असंतोष व राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणे होती.
- ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि त्यांच्यावर असणारी बंधने यामुळे सैनिकात असंतोष वाढत होता.
- भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती, कवायतीच्या वेळी होणारा अपमान, नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, वरिष्ठ पदांवर बढती न मिळणे यांमुळे भारतीय सैनिक दुखावले होते.
- आर्थिक पिळवणुकीबरोबरच धर्मांतर, भारतीयांच्या रूढी, परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे या गोष्टींमुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेल्या असंतोषात भर पडत गेली.
(ब) परिणाम:
- १८५७ च्या लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात उफाळलेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने ‘राणीचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला.
- त्यामध्ये सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत असे म्हणत राणीने भारतीयांना उद्देशून काही आश्वासने दिली. या आश्वासनांमध्ये भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान या निकषांच्या आधारे कोणताही भेद केला जाणार नाही असे म्हटले होते. तसेच नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील, धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही, संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल, संस्थाने खालसा केली जाणार नाहीत इत्यादी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यात होता.
- १८५७ च्या युद्धाने भारतीयांवरही खोलवर परिणाम झाला.
- प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
