Advertisements
Advertisements
Question
भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा.
Advertisements
Solution
(१) भिंगाचे वक्रता केंद्र (C) : भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्याच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र (C) म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 व C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात.
(२) भिंगाच्या वक्रता त्रिज्या (R) : भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात, त्या गोलांच्या त्रिज्यांना (R1 व R2) भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात.
(३) भिंगाचा मुख्य अक्ष : भिगांच्या दोन्ही वक्रता केंद्रांतून जाणारी काल्पनिक सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष होय.
(४) भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) : प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही, अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) म्हणतात.
(५) भिंगाची मुख्य नाभी (F) : जेव्हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण भिंगावर पडतात, तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात (एकत्र येतात) [बहिर्गोल भिंग] किंवा मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून अपसारित होतात (बाहेर पडतात) असे वाटते [अंतर्गोल भिंग]. या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी (F) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन मुख्य नाभी (F1 व F2) असतात.
(६) भिंगाचे नाभीय अंतर (f) : भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य (प्रकाशीय केंद्र) यांमधील अंतराला भिंगाचे नाभीय अंतर (f) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन नाभीय अंतरे (f1 व f2) असतात.

बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद
C1, C2 : वक्रता केंद्र R1, R2 : वक्रता त्रिज्या;
O : प्रकाशीय केंद्र (≡ प्रकाशीय मध्य)

भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O)

भिंगाची नाभी व भिंगाचे नाभीय अंतर
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.
प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.
भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.
व्याख्या लिहा.
भिंगाचे वक्रता केंद्र
व्याख्या लिहा.
भिंगाचे प्रकाशीय केंद्र
व्याख्या लिहा.
मुख्य नाभी
व्याख्या लिहा.
नाभीय अंतर
व्याख्या लिहा.
भिंगाचा मुख्य अक्ष
