मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

(१) भिंगाचे वक्रता केंद्र (C) : भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्याच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र (C) म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 व C2 अशी दोन वक्रता केंद्रे असतात.

(२) भिंगाच्या वक्रता त्रिज्या (R) : भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात, त्या गोलांच्या त्रिज्यांना (R1 व R2) भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात.

(३) भिंगाचा मुख्य अक्ष : भिगांच्या दोन्ही वक्रता केंद्रांतून जाणारी काल्पनिक सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष होय.

(४) भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) : प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही, अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O) म्हणतात.

(५) भिंगाची मुख्य नाभी (F) : जेव्हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण भिंगावर पडतात, तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात (एकत्र येतात) [बहिर्गोल भिंग] किंवा मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून अपसारित होतात (बाहेर पडतात) असे वाटते [अंतर्गोल भिंग]. या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी (F) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन मुख्य नाभी (F1 व F2) असतात.

(६) भिंगाचे नाभीय अंतर (f) : भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य (प्रकाशीय केंद्र) यांमधील अंतराला भिंगाचे नाभीय अंतर (f) म्हणतात. प्रत्येक भिंगाला दोन नाभीय अंतरे (f1 व f2) असतात. 

बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद

C1, C2 : वक्रता केंद्र R1, R2 : वक्रता त्रिज्या;
O : प्रकाशीय केंद्र (≡ प्रकाशीय मध्य) 

भिंगाचे प्रकाशीय केंद्र (O)

भिंगाची नाभी व भिंगाचे नाभीय अंतर 

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ९२

संबंधित प्रश्‍न

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग

भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.


नावे लिहा.

भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.


आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.


भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.


डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.


व्याख्या लिहा.

भिंगाचे प्रकाशीय केंद्र


व्याख्या लिहा.

भिंगाचा मुख्य अक्ष


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×