English

भारतातील पोर्तुगीज वसाहतींविषयी विस्तृत माहिती लिहा.

Advertisements
Advertisements

Question

भारतातील पोर्तुगीज वसाहतींविषयी विस्तृत माहिती लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्‍थापल्‍या. पोर्तुगिजांनी वसाहतींच्या रक्षणासाठी किल्‍ले उभारले. किल्‍ल्‍यांच्या आधारे बाह्य हल्‍ल्‍यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्‍ल्‍यांना रसद पुरवायची ही पोर्तुगिजांची युद्धनीती होती.
  2. त्यांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलुख ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्‍थानिक भारतीय सत्‍तांना शक्‍य झाले नाही.
  3. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगिजांनी वर्चस्‍व स्‍थापल्‍यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगिजांचे परवाने (कार्ताझ) घेणे आवश्यक झाले.
  4. परवान्याशिवाय प्रवास केल्‍यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते बुडवत असत. पोर्तुगिजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की, मुघल, आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांनासुद्धा कार्ताझ घेणे गरजेचे झाले.
  5. इ.स. १६०८ पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा (साष्‍टी व बारदेशसह), होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगिजांनी वसाहती उभारल्‍या.
  6. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्‌टिणम, मयिलापूर (सांव थोम) आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्‍या. पोर्तुगिजांच्या या पूर्वेकडील साम्राज्‍याची राजधानी गोवा येथे होती.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×