English

युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाचे परिणाम स्पष्ट करा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाचे परिणाम स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution 1

  1. धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला.
  2. पोपवरील लोकांची श्रद्धा कमी झाली.
  3. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली, त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.
  4. किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले.
  5. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले.
  6. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोषाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला.
  7. अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले.
shaalaa.com

Solution 2

  1. काही इतिहासकारांच्या मते, धर्मयुद्धांमुळे युरोपमधील सरंजामशाहीचा अंत झाला.
  2. पोपवरील लोकांचा विश्वास कमी होऊ लागला.
  3. मध्य आशियातील प्रदेशांशी आलेल्या संपर्कामुळे व्यापारात वाढ झाली आणि इटली व जर्मनीमधील शहरांसाठी व्यापाराच्या नवीन संधी खुल्या झाल्या.
  4. यामुळे व्यापाऱ्यांच्या एका नवीन वर्गाचा उदय झाला.
  5. युरोपातील युद्धपद्धतीत अनेक बदल घडून आले; उदाहरणार्थ, किल्ले बांधणे, किल्ल्यांचा लष्करी ठाणी म्हणून वापर करणे, पूल बांधणे इत्यादी बाबींमध्ये त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.
  6. युरोपातील राजांनी नवीन कर लादले, ज्यामुळे राजकोषात भर पडली.
  7. युरोपियनांना विविध प्रकारच्या नवीन वनस्पती, फळे, अत्तरे इत्यादींची ओळख झाली.
  8. युरोपियन लोकांचा अरबांशी संपर्क आला आणि त्यांनी किमयाशास्त्र, संगीत व वाणिज्य या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द स्वीकारले.
shaalaa.com
युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [Page 9]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ७.१ | Page 9
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×