English

भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.
  2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
  3. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नित्य दिशेकडून वारे वाहू लागतात.
  4. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो.
  5. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात.
    त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो.
  6. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात.
  7. नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात.
  8. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.
shaalaa.com
भारतामधील हवामान
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: हवामान - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 हवामान
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 31
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 हवामान
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 3

RELATED QUESTIONS

चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.


भौगोलिक कारणे लिहा:

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.


दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.


भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
  2. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
  3. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
  5. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
  6. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.

तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.

  1. सिक्कीम
  2. लक्षद्वीप बेटे

  3. चेन्नई बंदर
  4. आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
  5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
  6. कर्कवृत्त

वेगळा घटक ओळखा:

भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश 


थोडक्यात टिपा लिहा.

परतीचा मान्सून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×