English

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
  2. दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
  3. चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
  5. कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
  6. मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. i. चेन्नईमध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत जून ते ऑगस्टमध्ये कमी पर्जन्य आणि सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये पर्जन्यवृष्टी जास्त होते.
    ii. उर्वरित ठिकाणांचा विचार करता सर्वाधिक पर्जन्याचा कालावधी जून ते सप्टेंबर हा आहे.
    iii. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ मान्सूनच्या परतीचा काळ असतो. तमिळनाडू या राज्याला या काळामध्ये सर्वांत जास्त पाऊस मिळतो. त्यामुळेच, हा फरक दिसून येतो.
  2. i. दिल्ली व कोलकाता या दोन्ही शहरांचे तापमान जानेवारी ते मे या महिन्यांदरम्यान वाढताना दिसून येते.
    ii. जून महिन्यापासून दोन्ही शहरांच्या तापमानामध्ये घट झालेली दिसून येते.
    iii. ही घट डिसेंबरपर्यंत कायम असल्याचे दिसते.
  3. शहरे दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई
    सरासरी कमाल तापमान ४१° से ३६° से ३४° से ३९° से
    सरासरी किमान तापमान ७° से ९° से १७° से २१° से
    तापमान कक्षा ३४° से २७° से १७° से १८° से
  4. i. मुंबई या शहराचे तापमान इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे.
    ii. मुंबई हे शहर भारताच्या पश्चिम किनार्यावर असून स्थानिक वाऱ्यांमुळे (खारे व मतलई वारे) येथील हवामान सम आहे.
  5. i. दिल्ली या शहराची तापमान कक्षा जास्त आहे.
    ii. दिल्ली येथे फेब्रुवारी ते जून या काळात तापमान वाढत जाते व सप्टेंबर ते जानेवारी या काळात कमी कमी होत जाते.
    iii. यावरून येथील हवामान विषम प्रकारचे आहे, असा अंदाज करता येतो.
  6. तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे आपण असा अंदाज व्यक्त करू शकतो, की मुंबईचे हवामान सम प्रकारचे असून उष्ण व दमट आहे; कारण आलेखानुसार येथे जून ते सप्टेंबर या काळात पर्जन्यमान जास्त आहे; मात्र तापमानामध्ये या काळात फारसा फरक आढळत नाही.
shaalaa.com
भारतामधील हवामान
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: हवामान - आलेख

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 हवामान
आलेख | Q 2

RELATED QUESTIONS

चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.


भौगोलिक कारणे लिहा:

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.


दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.


भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.


भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.


खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.


तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.

  1. सिक्कीम
  2. लक्षद्वीप बेटे

  3. चेन्नई बंदर
  4. आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
  5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
  6. कर्कवृत्त

वेगळा घटक ओळखा:

भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश 


थोडक्यात टिपा लिहा.

परतीचा मान्सून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×