Advertisements
Advertisements
Question
ΔABC मध्ये ∠A = 90°. `square`DEFG या चौरसाचे D व E हे शिरोबिंदू बाजू BC वर आहेत. बिंदू F हा बाजू AC वर आणि बिंदू G हा बाजू AB वर आहे. तर सिद्ध करा. DE2 = BD × EC (ΔGBD व ΔCFE हे समरूप दाखवा. GD = FE = DE याचा उपयोग करा.)
Advertisements
Solution
`square`DEFG हा चौरस आहे.
∴ DE = EF = GF = GD .....(i) [चौरसाच्या बाजू]
∠GDE = ∠DEF = 90° ..........[चौरसाचे कोन]
∴ रेख GD ⊥ रेख BC, रेख FE ⊥ रेख BC ....(ii)
ΔBAC व ΔBDG मध्ये,
∠BAC ≅ ∠BDG ....[(ii) वरून, प्रत्येक कोन 90° चा असेल.]
∠ABC ≅ ∠DBG ...[सामाईक कोन]
∴ ΔBAC ∼ ΔBDG ....(iii) [समरूपतेची कोको कसोटी]
ΔBAC व ΔFEC मध्ये,
∠BAC ≅ ∠FEC ...[(ii) वरून, प्रत्येक कोन 90° चा असेल.]
∠ACB ≅ ∠ECF ....[सामाईक कोन]
∴ ΔBAC ∼ ΔFEC ....(iv) [समरूपतेची कोको कसोटी]
∴ ΔBDG ∼ ΔFEC ....[(iii) व (iv) वरून]
∴ `"BD"/"EF" = "GD"/"EC"` ....(v) [समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
∴ `"BD"/"DE" = "DE"/"EC"` .....[(i) व (v) वरून]
∴ DE2 = BD × EC
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती मध्ये ∠ABC = 75°, ∠EDC =75° तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा.

आकृती मधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये, बाजू PQ || बाजू SR, AR = 5AP, AS = 5AQ तर सिद्ध करा, SR = 5PQ.

आकृती मध्ये रेख XY || रेख BC तर खालील पैकी कोणते विधान सत्य आहे?

आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार?

शेजारील आकृतीमध्ये, BP लंब AC, CQ लंब AB, A-P-C आणि A-Q-B, तर ∆APB व ∆AQC समरूप दाखवा.
∆APB व ∆AQC मध्ये,
∠APB = `square^circ` ......(i)
∠AQC = `square^circ` ......(ii)
∠APB ≅ ∠AQC …[(i) व (ii) वरून]
∠PAB ≅ ∠QAC .............` square`
∆APB ~ ∆AQC .............` square`

आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा.
आकृतीमध्ये, ∠B = 75°, ∠D = 75°
∠B ≅ ______ .............[प्रत्येकी 75°]
∠C ≅ ∠C ..................[______]
∆ABC ~ ∆[______] ..............[______ समरूपता कसोटीनुसार]
आकृतीमध्ये रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि `"AP"/"PC" = "BP"/"PD"`, तर सिद्ध करा ∆ABP ~ ∆CDP.

समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB || बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात.
त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
- व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा.
- समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा.
