Advertisements
Advertisements
Question
एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर ३० किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे २० मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?
Advertisements
Solution

समजा, हमीदचा वेग x किमी/तास व जोसेफचा वेग y किमी/तास आहे.
20 मिनिटांत हमीदने पार केलेले अंतर म्हणजेच
`1/3` तास = `1/3x` किमी
जोसेफने `1/3` तासात पार केलेले अंतर = `1/3 y` किमी
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, A ते B मधील एकूण अंतर 30 किमी आहे.
∴ `1/3x + 1/3y = 30`
∴ x + y = 90 ....(i) [दोन्ही बाजूंना 3 ने गुणून]
हमीदने 3 तासांत पार केलेले अंतर= 3x किमी
जोसेफने 3 तासांत पार केलेले अंतर= 3y किमी
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, जोसेफ जर त्याच वेळी विरुद्ध दिशेने निघून गेला असता हमीद त्याच्या तीन तासांनी भेटला असता.

∴ 3x - 3y = 30
∴ x - y = 10 ....(ii) [दोन्ही बाजूंना 3 ने भागून]
समीकरण (i) व (ii) ची बेरीज करून,
x + y = 90
+ x - y = 10
2x = 100
∴ x = `100/2` = 50
x = 50 समीकरण (i) मध्ये ठेवून,
50 + y = 90
∴ y = 90 - 50 = 40
∴ हमीदचा वेग 50 किमी/तास व जोसेफचा वेग 40 किमी/तास आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.
10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात, तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?

समीकरणे सोडवून उत्तर लिहा.
100 रुपयांच्या नोटांची संख्या `square` 50 रुपयांच्या नोटांची संख्या `square`
एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?
एक व्यक्ती एका निश्चित पगार आणि दरवर्षी ठरावीक वेतनवाढ या अटींवर नोकरी सुरू करते. 4 वर्षांनी त्या व्यक्तीचा पगार रुपये 15000 आणि 10 वर्षांनी पगार रुपये 18000 असल्यास त्या व्यक्तीचा मूळ पगार आणि वेतनवाढ काढा.
समीकरण 3x - 2y = 17 मध्ये (i) y = -1 असताना x ची किंमत शोधा. (ii) x = 3 असताना y ची किंमत काढा.
एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठरावीक वेगाने कापते. जर गाडीचा वेग 6 कि.मी/तास वाढला असता, तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी/तास कमी झाला असता, तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
मी 75 ही संख्या मनात धरली, त्या संख्येच्या दोन्ही अंकांतील संबंध दर्शवणारी अट लिहा. मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून येणाऱ्या संख्येतील संबंध दर्शवणारी अट लिहा.
एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा.
