English

एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा. गोलरक्षक हा संघनायक असणे.

Advertisements
Advertisements

Question

एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

गोलरक्षक हा संघनायक असणे.

Sum
Advertisements

Solution

हॉकी संघांतील एकूण खेळाडू = 6 + 4 + 1 = 11

∴ n(S) = 11

समजा, घटना A : निवडलेला संघनायक हा गोलरक्षक असणे

हॉकी संघात एकच गोलरक्षक आहे.

∴ n(A) = 1

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`

∴ P(A) = `1/11`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [Page 126]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 3. (1) | Page 126

RELATED QUESTIONS

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.

i) काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

ii) काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.

iii)  काढलेल्या कार्डावरील संख्या 3 ची विभाज्य संख्या असणे. 


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.


एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर तिकिटावरची संख्या ५ च्या पटीत असणे, या घटनांची संभाव्यता काढा.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

एक्का मिळणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा हिरवा असणे.


एका फाशाची सहा पृष्ठे खालीलप्रमाणे आहेत.

हा फासा एकदाच टाकला, तर पुढील घटनाची संभाव्यता काढा.

वरच्या पृष्ठभागावर ‘D’ मिळणे.


एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.


संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.

  1. तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.
  2. तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
  3. बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.
  4. बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.

0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

ती संख्या 4 च्या पटीत असणे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×