English

एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?

Advertisements
Advertisements

Question

एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. त्या आयताची परिमिती 52 सेमी असल्यास आयताची लांबी किती?

Sum
Advertisements

Solution

समजा, आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे x सेमी आणि y सेमी आहे.

पहिल्या अटीनुसार,

आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 5 ने जास्त आहे.

∴ x = 2y + 5 

∴ x – 2y = 5 …...(i)

दुसऱ्या अटीनुसार,

आयताची परिमिती 52 सेमी आहे. 

∴ 2(x + y) = 52

∴ 2x + 2y = 52 .........(ii)

समीकरण (i) व (ii) यांची बेरीज करून,

      x – 2y = 5
+ 2x + 2y = 52
      3x       = 57

∴ x = `57/3 = 19`

∴ आयताची लांबी 19 सेमी आहे. 

shaalaa.com
एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.३ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bijganit (Ganit 1) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.३ (ब) | Q ७.

RELATED QUESTIONS

कृती पूर्ण करा.


विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?


कांताबाईंनी दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले, की या वस्तू ऑनलाइन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा व ७ किलोग्राम साखर ऑनलाइन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला, तर चहा आणि साखर यांचा प्रतिकिलोग्राम दर काढा.


मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.


एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यांतील अंतर ३० किमी आहे. हमीद मोटारसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटारसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे २० मिनिटांत एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमीद तीन तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता?


एक कोन आणि त्याचा कोटिकोन यांच्या मापांतील फरक 10° असल्यास मोठ्या कोनाचे माप किती? 


एका अंकगणिती श्रेढीसाठी t17 = 54 आणि t9 = 30 असल्यास प्रथम पद (a) आणि सामान्य फरक (d) काढा. 


सोडवा. 0.4x + 0.3y = 1.7; 0.7x – 0.2y = 0.8.


एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमी ने जास्त आहे, तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती?


कोणतीही दोन एकसामयिक समीकरणे लिहा- ज्यामध्ये चलांच्या किमती 12 आणि 10 असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×