SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2025-2026
Date & Time: 23rd February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
- सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सुचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून येऊ नयेत.
- विभाग 5 - उपयोजित लेखन प्र.5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: (2)
- पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली, कारण ................
- आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत, कारण ................
|
दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते. “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.” “पण........मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.” “काही उपयोग होणार नाही!” “का?” “का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील.” |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
दोरीबरील उड्यांचे झालेले परिणाम

(3) स्वमत: (3)
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
Chapter:
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण ते लिहा: (2)
- रेखामवशींना दार उघडणारा ..............
- स्वच्छतेची भोक्ती असलेली ..............
|
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?” हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. “अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?” |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

(3) स्वमत:
‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. (3)
Chapter:
उत्तार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: (2)
- शब्दांच्या पलीकडची भाषा - ..................
- उताऱ्यात आलेले कवीचे नाव - ..................
|
शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्धा हातात हात लागतो. एखादया व्यक्तीचा हात हातात घेण्याने काही आठवणी जाग्या होत असतात.आजच्या अंगाखांद्यावर खेळलेली नातवंडं मोठी झाल्यावर जेव्हा आजीचा हात हातात घेतात, तेव्हा कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर’ अशीच तिची अवस्था होत असेल. कोऱ्या वह्या-पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्याच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श असे कितीतरी आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. या आठवणींच्या अत्तराची मनात दडवून ठेवलेली कुपी हलकेच उघडते आणि मनभर सुगंध दरवळतो. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण ते लिहा: (2)
- परमेश्वराचे दास -
- मेघाला विनवणी करणारा -
|
अग्नीमाजि पडे बाळू तैसा धांवें माझिया काजा॥ सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
(2) आकृती पूर्ण करा: (2)

(3) पुढील शब्दांचे अर्थ लिहा: (2)
- धेनू -
- काज -
- अंकिला -
- सवें -
(4) काव्यसौंदर्य:
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. (2)
Chapter:
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दधांच्या आधारे कृती करा:
| मुद्दे | रंग मजेचे रंग उद्याचे |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) कवितेचा विषय | |
| (3) कवितेतून मिळणारा संदेश | |
| (4) सरळ अर्थ लिहा. | ‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू’ |
| (5) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
Chapter:
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दधांच्या आधारे कृती करा:
| मुद्दे | औक्षण |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (2) कवितेचा विषय | |
| (3) कवितेतून मिळणारा संदेश | |
| (4) सरळ अर्थ लिहा. | ‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू’ |
| (5) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण |
Chapter:
‘जाता अस्ताला’ कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
Chapter: [8.2] जाता अस्ताला (स्थूलवाचन)
‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीची यथार्थता ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Chapter:
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
Chapter: [16.2] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
तुला चित्र काढायला आवडते का?
Chapter:
खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
भारत माझा देश आहे.
Chapter:
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:
नेहमी खरे बोलावे. (आज्ञार्थी करा.)
Chapter:
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा:
तो देखावा खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
Chapter:
Advertisements
पुढील वाक्म्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
तथ्य असणे.
Chapter:
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्साहाला उधाण येणे.
Chapter: [18] व्याकरण विभाग
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
ऋण असणे
Chapter:
खालील शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
नदी
Chapter: [18] व्याकरण विभाग
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.
Chapter: [18] व्याकरण विभाग
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.
Chapter: [18] व्याकरण विभाग
Advertisements
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा:
“पंत फरक दिसतो हं”
Chapter:
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा:
“बाबा तुम्ही मला ओळखले”
Chapter:
| चला, हस्ताक्षर सुंदर करुया! ज्ञानमंदिर संस्था, धुळे आयोजित ‘सुंदर हस्ताक्षर वर्ग’ 1 जून ते 10 जून शालेय विद्या्थ्यांसाठी सुवर्णसंधी! संपर्क - व्यवस्थापक, ज्ञानमंदिर संस्था, आधारकर मार्ग, धुळे. [email protected] |
कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने हस्ताक्षर वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र लिहा.
Chapter:
| चला, हस्ताक्षर सुंदर करुया! ज्ञानमंदिर संस्था, धुळे आयोजित ‘सुंदर हस्ताक्षर वर्ग’ 1 जून ते 10 जून शालेय विद्या्थ्यांसाठी सुवर्णसंधी! संपर्क - व्यवस्थापक, ज्ञानमंदिर संस्था, आधारकर मार्ग, धुळे. [email protected] |
कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने हस्ताक्षर वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Chapter:
दिलेल्या अपटठित उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्धा हातात हात लागतो. एखादया व्यक्तीचा हात हातात घेण्याने काही आठवणी जाग्या होत असतात.आजच्या अंगाखांद्यावर खेळलेली नातवंडं मोठी झाल्यावर जेव्हा आजीचा हात हातात घेतात, तेव्हा कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर’ अशीच तिची अवस्था होत असेल. कोऱ्या वह्या-पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्याच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श असे कितीतरी आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. या आठवणींच्या अत्तराची मनात दडवून ठेवलेली कुपी हलकेच उघडते आणि मनभर सुगंध दरवळतो. |
Chapter:
खालील शब्दांचा उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा.
| संगणक वर्ग | ||
| काळाची गरज | तज्ज्ञ मार्गदर्शक | |
| कालावधी |
Chapter:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
| अभिनव विद्यामंदिर ‘मराठी भाषा दिन’ 27 फेब्रुवारी ‘कवितावाचन, बालनाट्य, गीतगायन असा रंगतदार कार्यक्रम.’ |
Chapter:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा:
एक खोडकर मुलगा - गुरे राखण्यास रानात जाणे - अनेक खोड्या - एक दिवस 'लांडगा आला रे आला' असे ओरडणे - लोक काठ्या घेऊन धावत येणे - मुलगा हसत सुटणे - असे अनेक वेळा करणे - एक दिवस खरा लांडगा येणे - ओरडणे - कोणीही मदतीला न येणे - नुकसान - तात्पर्य.
Chapter:
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील विषयावर प्रसंगलेखन करा.

Chapter:
मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

Chapter:
दिलेल्या विषयावर तुमचे विचार मांडा.
‘अंधश्रद्धा – एक शाप’
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] with solutions 2025 - 2026
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.
How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
