मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) कोण ते लिहा: (i) परमेश्वराचे दास - (ii) मेघाला विनवणी करणारा - अग्नीमाजि पडे बाळू माता धांवें कनवाळू ॥१॥ तैसा धांवें माझिया काजा॥

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) कोण ते लिहा:  (2)

  1. परमेश्वराचे दास -
  2. मेघाला विनवणी करणारा - 

अग्निमाजि पडे बाळू
माता धांवें कनवाळू ॥१॥

तैसा धांवें माझिया काजा॥
अंकिला मी दास तुझा ॥२॥

सवेंचि झेंपावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥

भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे ॥४॥

वणवा लागलासे वनीं।
पाडस चिंतीत हरणी ॥५॥

नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा ॥६॥

(2) आकृती पूर्ण करा:  (2)

(3) पुढील शब्दांचे अर्थ लिहा:  (2)

  1. धेनू -
  2. काज -
  3. अंकिला -
  4. सवें -

(4) काव्यसौंदर्य:

संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.  (2)

आकलन
Advertisements

उत्तर

(1) 

  1. परमेश्वराचे दास – संत नामदेव
  2. मेघाला विनवणी करणारा – चातक

(2) 

(3) 

  1. धेनू - गाय
  2. काज - काम
  3. अंकिला - कवटाळले/मिठी मारली
  4. सवें - लगेच/तत्काळ

(4) संत नामदेव ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात श्रीविठ्ठलाला मातेच्या रूपात पाहतात आणि त्यांनी विठ्ठलाकडे अत्यंत आर्ततेने विनंती केली आहे. ही विनंती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी खालील उदाहरणे दिली आहेत:

  1. पक्षिणीचे उदाहरण: ज्याप्रमाणे झाडावरून खाली पडणाऱ्या आपल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षिणी क्षणाचाही विलंब न लावता जमिनीकडे झेपावते, तसेच देवा तू माझ्यासाठी धावून ये.
  2. धेनूचे (गायीचे) उदाहरण: भुकेले वासरू ओरडत असताना गाय जशी हंबरत त्याच्याकडे धावते, तशीच माझी हाक ऐकून तू माझ्याकडे ये.
  3. हरिणीचे उदाहरण: वणवा पेटलेला असताना त्यात आपले पाडस अडकले आहे हे पाहून हरिणी जशी व्याकुळ (चितिंत) होऊन धावते, तशीच माझ्या संकटात तू मला मदत कर. 
  4. थोडक्यात संत नामदेव स्वतःला विठ्ठलाचे ‘दास’ मानतात. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते, तसेच विठ्ठलानेही आई होऊन माझं रक्षण करावं, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×