मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

‘जाता अस्ताला’ कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘जाता अस्ताला’ कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

दीर्घउत्तर
सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर १

कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गातील प्रकाशमान सूर्य आणि मिणमिणता प्रकाश देणारी पणती यांच्या माध्यमातून सजीवसृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये जगाला सुंदर करण्याची क्षमता असते, असा संदेश दिला आहे. 

सूर्यास्तानंतर ही संपूर्ण पृथ्वी अंधकारमय होणार आहे. विश्वाच्या काळजीने सूर्य सर्वांना विनंती करतो, की पृथ्वीला अंधारात बुडण्यापासून वाचवा; पण त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही कारण सूर्यासमान क्षमता, सामर्थ्य आपल्यात नाही असे सर्वांना वाटते. अशावेळी पणती पुढे येते, मोठ्या नम्रतेने ती पृथ्वीला सांभाळण्याची जबाबदारी उचलते. भले ती सूर्याइतका प्रकाश पृथ्वीला देऊ शकणार नाही; मात्र पृथ्वीला अंधकारमय होऊ देणार नाही अशी जिद्द मनात ती बाळगते. तिची आंतरिक इच्छाशक्ती श्रेष्ठ आहे आणि त्या आधारेच ती मोठी जबाबदारी उचलते. सूर्यालाही पणतीवर विश्वास आहे. पणतीचे धैर्य अन् नम्र भाव सूर्याला चिंतामुक्त करतो.

आपल्याही आसपास अशा सामर्थ्यशाली व्यक्ती असतात, ज्यांना मदतीची गरज असते. त्यावेळी आपण आपल्या परीने शक्य ती मदत त्यांना करावी. एखाद्या कार्यात आपला खारीचा का होईना, वाटा उचलावा. प्रत्येकामध्ये क्षमता असते; केवळ आपल्यातील क्षमतेला योग्य कार्यात वापरण्याचे ज्ञान, विश्वास व सकारात्मकता आपल्यात असली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आत लपलेल्या गुणांना जाणून घेणार नाही तोपर्यंत ते कधीच इतरांसमोर येणार नाहीत. या सुप्तगुणांना वाट मोकळी करून द्यावी, कोणालाही कमी लेखू नये कारण या जीवसृष्टीत प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे अन् प्रत्येक वस्तू आपल्या क्षमतेनुसार जग सुंदर करत असते, असा अर्थ या प्रतीकांतून व्यक्त होतो.

shaalaa.com

उत्तर २

‘जाता अस्ताला’ या कवितेत सूर्य आणि पणती ही प्रतीके अर्थपूर्ण आहेत.

कवितेत सूर्य हे तेज, सामर्थ्य, कर्तृत्व आणि मोठेपणाचे प्रतीक आहे. सूर्य मावळतो म्हणजे मोठी शक्ती किंवा महान व्यक्ती एक दिवस निवृत्त होते किंवा नाहीशी होते, असा अर्थ यातून सूचित होतो.

तर पणती हे लहान असले तरी प्रकाश देणारे साधन आहे. ती आशा, सातत्य आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे. सूर्य अस्ताला गेला तरी पणती आपल्या परीने अंधार दूर करण्याचा प्रयत्न करते.

या प्रतीकांद्वारे कवी सांगतो की मोठी व्यक्ती नसली तरी लहानांनीही निराश न होता आपले कर्तव्य करत राहावे आणि समाजात प्रकाश पसरवावा.

shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to their question and preferred marks.

जाता अस्ताला
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8.2: जाता अस्ताला - कृती [पृष्ठ ३२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8.2 जाता अस्ताला
कृती | Q (४) | पृष्ठ ३२

संबंधित प्रश्‍न

तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.


पणतीच्या उदाहरणातून 'जाता अस्ताला' कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.


सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावनांचे वर्णन शब्दबद्ध करा.


सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.

 


तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.


सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.


सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.


कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.


प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×