Advertisements
Advertisements
प्रश्न
| चला, हस्ताक्षर सुंदर करुया! ज्ञानमंदिर संस्था, धुळे आयोजित ‘सुंदर हस्ताक्षर वर्ग’ 1 जून ते 10 जून शालेय विद्या्थ्यांसाठी सुवर्णसंधी! संपर्क - व्यवस्थापक, ज्ञानमंदिर संस्था, आधारकर मार्ग, धुळे. [email protected] |
कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने हस्ताक्षर वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र लिहा.
Advertisements
उत्तर
दिनाक - २० मे २०२५,
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
ज्ञानमंदिर संस्था,
आधारकर मार्ग,
पुणे.
विषय: सुंदर हस्ताक्षर वर्गात सहभागी होण्याबाबत विनंती.
महोदय,
सप्रेम नमस्कार.
मी योगेश भावे, साधना विद्यालय, धुळे येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणास हे पत्र लिहित आहे। आपल्या ‘ज्ञानमंदिर संस्था’ तर्फे दिनांक १ जून ते १० जून या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी “सुंदर हस्ताक्षर वर्ग” आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला।
आजच्या संगणकाच्या युगातदेखील सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व अत्यंत मोठे आहे। स्वच्छ आणि आकर्षक अक्षरामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासातही अधिक रुची निर्माण होते। आपल्या संस्थेचा हा उपक्रम आमच्यासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे।
माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थी या वर्गात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत। त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना या वर्गात प्रवेश मिळावा, ही नम्र विनंती आहे। तसेच, या वर्गाची फी व इतर नियमांविषयी सविस्तर माहिती दिल्यास आम्हाला अधिक सोयीचे होईल।
आपला नम्र,
योगेश भावे
विद्यार्थी प्रतिनिधी,
साधना विद्यालय,
धुळे.
