मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने हस्ताक्षर वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

चला, हस्ताक्षर सुंदर करुया!
ज्ञानमंदिर संस्था, धुळे
आयोजित
‘सुंदर हस्ताक्षर वर्ग’
1 जून ते 10 जून
शालेय विद्या्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
संपर्क - व्यवस्थापक, ज्ञानमंदिर संस्था,
आधारकर मार्ग, धुळे.
[email protected]

कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने हस्ताक्षर वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

दिनाक - २० मे २०२५,

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
ज्ञानमंदिर संस्था,
आधारकर मार्ग,
धुळे.

विषय: ‘सुंदर हस्ताक्षर वर्गा’च्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन.

महोदय,

मी युगंधर भावे, साधना विद्यालय, धुळे येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे पत्र लिहित आहे.

आपल्या ज्ञानमंदिर संस्थेमार्फत दिनांक १ जून ते १० जून या कालावधीत सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सुंदर हस्ताक्षर वर्गाबद्दल आम्हाला सविस्तर माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम राबवल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!

आजच्या आधुनिक युगातही सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व खूप मोठे आहे. “सुंदर अक्षर हाच खरा दागिना” या उक्तीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या वर्गामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले हस्ताक्षर सुधारण्यास निश्चितच मदत होईल.

आपल्या संस्थेकडून असेच नाविन्यपूर्ण उपक्रम भविष्यातही सुरू राहोत, हीच मनःपूर्वक इच्छा!

आपली नम्र,
कु. युगंधर भावे
विद्यार्थी प्रतिनिधी,
साधना विद्यालय,
धुळे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×