मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

उत्तार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) कोण ते लिहा: (i) रेखामवशींना दार उघडणारा (ii) स्वच्छतेची भोक्ती असलेली अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या.

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्तार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) कोण ते लिहा:  (2)

  1. रेखामवशींना दार उघडणारा ..............
  2. स्वच्छतेची भोक्ती असलेली ..............

      अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी  सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?” हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.

      “अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?”

(2) आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

(3) स्वमत:

‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.  (3)

आकलन
Advertisements

उत्तर

(1) 

  1. अभिषेक
  2. स्नेहल

(2) 

(3) वृक्षारोपण आणि त्यांचे योग्य संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकाधिक झाडे लावून त्यांची काळजी घेतली पाहिजे, कारण झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. प्रदूषण कमी करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर मर्यादित ठेवून सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळणेही महत्त्वाचे आहे, कारण ते जमिनीची गुणवत्ता खराब करून पर्यावरणाला हानी पोहोचवते. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा योग्य वापर करावा आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सारख्या उपाययोजना राबवाव्यात. याशिवाय सौर ऊर्जेसारख्या नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा अधिक वापर केल्यास पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होऊ शकते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×