Advertisements
Advertisements
प्रश्न
त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढरीमध्ये आहेत. सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे काढा. (त्रिकोणाच्या कोनांची मापे a, a + d, a + 2d घ्या.)
Advertisements
उत्तर
समजा, त्रिकोणाच्या तीन कोनांची मापे अंकगणिती श्रेढीत अनुक्रमे a, a + d, a + 2d, आहेत.
येथे a = पहिले पद, d = साधारण फरक
त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.
∴ a + a + d + a + 2d = 180°
∴ 3a + 3d = 180°
∴ a + d = `180^circ/3`
∴ a + d = 60° ...(i)
दिलेल्या अटीनुसार, सर्वांत लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या पाचपट आहे.
∴ a = 5d
a = 5d समीकरण (i) मध्ये ठेवून,
5d + d = 60°
∴ 6d = 60°
∴ d = `60^circ/6` = 10°
∴ a = 5d = 5(10°) = 50°
a + d = 50° + 10° = 60°
a + 2d = 50° + 2(10°)
= 50° + 20°
= 70°
∴ त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे 50°, 60° व 70° आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे तर S27 काढा.
a = 6, d = 3, S27 = ?
`"S"_"n" = "n"/2 [square + ("n" - 1)"d"]`
`"S"_27 = 27/2 [12 + (27 - 1)square]`
`= 27/2 xx square`
= 27 × 45 = `square`
1 व 350 यांमधील सर्व सम संख्यांची बेरीज काढा.
एका अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद 52 आणि 38 वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा.
एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.
एका अंकगणिती श्रेढीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच, त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे, तर ती चार पदे काढा.
(चार क्रमागत पदे a - d, a, a + d, a + 2d माना.)
एका क्रमिकेत tn = 2n - 5 आहे, तर तिची पहिली दोन पदे काढा.
पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज करा.
कृती: समजा, 1 + 2 + 3 + .........+ 1000
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र Sn = `square` वापरून,
S1000 = `square/2` (1 + 1000)
= 500 × 1001
= `square`
प्रथम 1000 धन पूर्णांकांची बेरीज `square` एवढी आहे.
4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.
पहिल्या 'n' सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.
ज्या अंकगणिती श्रेढीत पहिले पद p आहे, दुसरे पद q आहे आणि शेवटचे पद r आहे तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `(q + r - 2p) xx (p + r)/(2(q - p))` एवढी आहे हे दाखवा.
