मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. 

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, O(h, k) हा बिंदू P, Q व R मधून जाणाऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे.

OP = OQ ......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt((h - 6)^2 + [k - (-6)]^2) = sqrt((h - 3)^2 + [k - (-7)]^2)` ....[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ (h - 6)2 + [k - (-6)]2 = (h - 3)2 + [k - (-7)]......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]

∴ (h - 6)2 + (k + 6)2 = (h - 3)2 + (k + 7)

∴ h2 - 12h + 36 + k2 + 12k + 36 = h2 - 6h + 9 + k2 + 14k + 49 

∴ 6h + 2k = 14

∴ 3h + k = 7  ...(i) [दोन्ही बाजूंना 2 ने भागून]

OP = OR ......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt((h - 6)^2 + [k - (-6)]^2) = sqrt((h - 3)^2 + (k - 3)^2)` ....[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ (h - 6)2 + [k - (-6)]2 = (h - 3)2 + (k - 3)......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]

∴ (h - 6)2 + (k + 6)2 = (h - 3)2 + (k - 3)2

∴ h2 - 12h + 36 + k2 + 12k + 36 = h2 - 6h + 9 + k2 - 6k + 9 

∴ 6h - 18k = 54

∴ 3h - 9k = 27 .....(ii) [दोन्ही बाजूंना 2 ने भागून]

समीकरण (i) मधून (ii) वजा करून, 

3h + k = 7
3h - 9k = 27
-    +      -
10k = -20

∴ k = `(-20)/10 = -2`

k ची किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

3h + k = 7

∴ 3h - 2 = 7

∴ 3h = 9

∴ h = `9/3 = 3`

∴ वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक (3, -2) आहेत.  

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 20. | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्‍न

A(1, 2), B(1, 6), C(1 + `2sqrt3` , 4) हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2,-5) आणि Q(-2,9) पासून समदूर असेल.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

A(a, 0), B(0, a)


जर P(2,1), Q(-1,3), R(-5,-3) आणि S(-2,-5) तर `square`PQRS हा आयत आहे हे दाखवा.


बिंदू A(–3, 4) आणि आरंभबिंदू O यांमधील अंतर काढा.


A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती? 


(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा. 


A(–4, –7), B(–1, 2), C(8, 5) आणि D(5, –4) हे चौकोनाचे शिरोबिंदू असतील, तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा.


O केंद्र असलेल्या वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे. जर A चे निर्देशक (0, 2) असतील तर बिंदू (1, 2) हा वर्तुळावर आहे किंवा नाही पडताळा घ्या.

 


O(0, 0) आणि P(3, 4) या दोन बिंदूतील अंतर काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×