मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, O(h, k) हा ΔABC च्या परिवर्तुळाचा केंद्र आहे.

OA = OC .......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt((h - 7)^2 + (k - 1)^2) = sqrt((h - 2)^2 + (k - 0)^2)` ....[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ (h - 7)2 + (k - 1)2 = (h - 2)2 + (k - 0)......[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]

∴ h2 - 14h + 49 + k2 - 2k + 1 = h2 - 4h + 4 + k

∴ 10h + 2k = 46

∴ 5h + k = 23 .....(i) [दोन्ही बाजूंना 2 ने भागून]

OB = OC .....[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∴ `sqrt((h - 3)^2 + (k - 5)^2) = sqrt((h - 2)^2 + (k - 0)^2)` ....[अंतराच्या सूत्रानुसार]

∴ (h - 3)2 + (k - 5)2 = (h - 2)2 + (k - 0).....[दोन्ही बाजूंचे वर्ग करून]

∴ h2 - 6h + 9 + k2 - 10k + 25 = h2 - 4h + 4 + k2

∴ 2h + 10k = 30

∴ h + 5k = 15 .....(ii) [दोन्ही बाजूंना 2 ने भागून]

समीकरण (i) ला 5 ने गुणून,

25h + 5k = 115 …(iii)

समीकरण (iii) मधून (ii) वजा करून,

25h + 5k = 115
    h + 5k = 15
     -     -      - 
24h       = 100 

∴ h = `100/24 = 25/6`

h ची किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

5h + k = 23

∴ `5(25/6) + k = 23`

∴ k = 23 - `125/6 = (138 - 125)/6`

∴ k = `13/6`

∴ O(h, k) = `(25/6, 13/6)`

अंतराच्या सूत्रानुसार,

त्रिज्या = d(O, C) = `sqrt((25/6 - 2)^2 + (13/6 - 0)^2)`

= `sqrt(((25 - 12)/6)^2 + (13/6)^2)`

= `sqrt((13/6)^2 + (13/6)^2)`

= `sqrt(2(13/6)^2)`

= `(13sqrt(2))/6` एकक

∴ त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक `(25/6, 13/6)` आहे व त्याची त्रिज्या `(13sqrt(2))/6` एकक आहे.

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 16. | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्‍न

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.

A(1, −3), B(2, −5), C(−4, 7)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.

P(-2, 3), Q(1, 2), R(4, 1)


जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) यातील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

P(-6, -3), Q(-1, 9)


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

R(-3a, a), S(a, -2a) 


P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा. 


A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)


(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा. 


O केंद्र असलेल्या वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे. जर A चे निर्देशक (0, 2) असतील तर बिंदू (1, 2) हा वर्तुळावर आहे किंवा नाही पडताळा घ्या.

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×