मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जर A(4,-3) आणि B(8,5), तर रेख AB चे 3ः1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर A(4,-3) आणि B(8,5), तर रेख AB चे 3ः1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, बिंदू C रेख AB ला 3 : 1 या गुणोत्तरात विभागतो.

येथे, A(x1, y1) = A(4, -3)

B(x2, y2) = B(8, 5)

∴ विभाजनाच्या सूत्रानुसार,

C चा x निर्देशक = `(mx_2 + nx_1)/(m + n)`

= `(3(8) + 1(4))/(3 + 1) = (24 + 4)/4 = 28/4`

∴ C चा x निर्देशक = 7

C चा y निर्देशक = `(my_2 + ny_1)/(m + n) = (3(5) + 1(-3))/(3 + 1)`

∴ C चा y निर्देशक = `(15 - 3)/4 = 12/4 = 3`

∴ रेख AB चे 3 : 1 या गुणोत्तरात विभाजन करणार्या बिंदूचे निर्देशक (7, 3) आहे. 

shaalaa.com
विभाजनाचे सूत्र (Section formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 17. | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्‍न

जर P बिंदू हा A(−1, 7) आणि B(4, −3) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 : 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा.


बिंदू A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB चे P(k, 7) हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि k ची किंमत काढा.


A(-14, -10), B(6, -2) असलेल्या रेख AB चे चार एकरूप रेषाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


A(20, 10), B(0, 20) असलेल्या रेख AB चे पाच एकरूप रेषाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


खालील दिलेल्या उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा.

P(-2, -5), Q(4, 3), a : b = 3 : 4


जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(–1, –1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.


जर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक ______ 


बिंदू A(3, 5) आणि B(7, 9) असून बिंदू Q हा रेख AB चे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर Q या बिंदूचे x निर्देशक काढा.


बिंदू P(–4, 6) हा A(–6, 10) आणि B(m, n) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2:1 या गुणोत्तरात विभागतो, तर बिंदू B चे निर्देशक काढा.


A(3, 5) आणि B(–6, 7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y–अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो? तसेच त्या बिंदूचे निर्देशक काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×