मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

A(3, 5) आणि B(–6, 7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y–अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो? तसेच त्या बिंदूचे निर्देशक काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

A(3, 5) आणि B(–6, 7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y–अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो? तसेच त्या बिंदूचे निर्देशक काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, बिंदू C रेख AB चे m : n या गुणोत्तरात विभाजन करतो.

बिंदू C Y - अक्षावरील बिंदू आहे.

∴ त्याचा X निर्देशक 0 आहे.

समजा, C = (0, y)

येथे, A (x1, y1) = A(3, 5) 

B (x2, y2) = B(–6, 7)

विभाजनाच्या सूत्रानुसार,

x = `(mx_2 + nx_1)/(m + n)`

∴ 0 = `(-6m + 3n)/(m + n)`

∴ –6m + 3n = 0

∴ 3n = 6m

∴ `m/n = 3/6`

∴ `m/n = 1/2` .............(i)

∴ m : n = 1 : 2

विभाजनाच्या सूत्रानुसार,

y = `(my_2 + ny_1)/(m + n)`

y = `(7m + 5n)/(m + n)`

= `(7m + 5(2m))/(m + 2m)` ............[(i) वरून, n = 2m]

= `(7m + 10m)/(3m)`

= `(17m)/(3m) = 17/3`

∴ AB या रेषाखंडाला Y–अक्ष 1 : 2 या गुणोत्तरात विभागतो आणि या बिंदूचे निर्देशक `(0, 17/3)` आहेत. 

shaalaa.com
विभाजनाचे सूत्र (Section formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - Q ५

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

P-T-Q असून, बिंदू T(-1, 6) हा बिंदू P(-3, 10) आणि बिंदू Q(6, -8) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो?


बिंदू A(2, 7) आणि B(-4, -8) यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


A(-14, -10), B(6, -2) असलेल्या रेख AB चे चार एकरूप रेषाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.


खालील दिलेल्या उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा.

P(-3, 7), Q(1, -4), a : b = 2 : 1


खालील दिलेल्या उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा.

P(2, 6), Q(-4, 1), a : b = 1 : 2


A(3,8) आणि B(-9,3) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y - अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो?


जर बिंदू P(1, 1) हा बिंदू A आणि B(–1, –1) यांना जोडणाऱ्या रेषाखंडास 5:2 या गुणोत्तरात छेदत असेल,तर A या बिंदूचे निर्देशक काढा.


जर A(–5, 3) आणि B(3, –5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला बिंदू P हा 1:3 या गुणोत्तरात विभागत असेल, तर P चे निर्देशक ______ 


A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB ला बिंदू P(6, 7) ज्या गुणोत्तरात विभागतो ते गुणोत्तर शोधा.

कृती: बिंदू P हा रेख AB ला m : n या गुणोत्तरात विभागतो.

A(8, 9) = (x1, y1), B(1, 2) = (x2, y2) P(6, 7) = (x, y)

विभाजन सूत्रानुसार, 

∴ 7 = `(m(square) - n(9))/(m + n)`

∴ 7m + 7n = `square` + 9n

∴ 7m - `square` = 9n - `square`

∴ `square` = 2n

∴ `m/n  = square` 


जर P हा बिंदू A(4, -3) आणि B(8, 5) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 3 : 1 या गुणोत्तरात विभाजन करत असेल, तर P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

∴ रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार,

∴ x = `(mx_2 + nx_1)/square`,

∴ x = `(3 xx 8 + 1 xx 4)/(3 + 1)`,

= `(square + 4)/4`, 

∴ x = `square`

∴ y = `square/(m + n)`

∴ y = `(3 xx 5 + 1 xx (-3))/(3 + 1)`

= `(square - 3)/4`

∴ y = `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×