Advertisements
Advertisements
प्रश्न
(2, 0), (–2, 0) आणि (0, 2) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. तसेच त्या त्रिकोणाचा प्रकार सकारण ठरवा.
Advertisements
उत्तर
समजा, P(2, 0), Q(–2, 0) आणि R(0, 2) हे दिलेले बिंदू आहेत.
दोन बिंदूंमधील अंतर = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
अंतराच्या सूत्रानुसार,
d(P, Q) = `sqrt([(-2) - 2]^2 + (0 - 0)^2)`
= `sqrt((-4)^2 + (0)^2)`
= `sqrt(16 + 0)`
= 4 ..............(i)
d(Q, R) = `sqrt([0 - (-2)]^2 + (2 - 0)^2)`
= `sqrt((2)^2 + (2)^2)`
= `sqrt(4 + 4)`
= `sqrt8` ................(ii)
d (P, R) = `sqrt((0 - 2)^2 + (2 - 0)^2)`
= `sqrt((-2)^2 + (2)^2)`
= `sqrt(4 + 4)`
= `sqrt8` ....................(iii)
(i) आणि (ii) ची बेरीज करून,
d(P, Q) + d(Q, R) = 4 + `sqrt8`
4 + `sqrt(8)` > `sqrt(8)`
∴ d(P, Q) + d(Q, R) > d(P, R)
∴ P, Q, R हे एकरेषीय बिंदू नाहीत.
तीन नैकरेषीय बिंदूंमधून त्रिकोण तयार होऊ शकतो.
∴ या दिलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांपासून त्रिकोण तयार होतो. आता, d(Q, R) = d(P, R)
∴ ∆PQR समद्विभुज त्रिकोण आहे.
∴ (2, 0), (–2, 0) आणि (0, 2) हे समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
L(-2, 3), M(1, -3), N(5, 4)
जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) यातील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.
खालील बिंदूंतील अंतर काढा.
A(a, 0), B(0, a)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
R(-3a, a), S(a, -2a)
बिंदू P(–1, 1) आणि बिंदू Q(5, –7) आहेत. तर बिंदू P आणि Q मधील अंतर ______
A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?
C(–3a, a), D(a, –2a) या दोन बिंदूंमधील अंतर काढा.
A(–4, –7), B(–1, 2), C(8, 5) आणि D(5, –4) हे चौकोनाचे शिरोबिंदू असतील, तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा.
(0, –1), (8, 3), (6, 7) व (–2, 3) हे बिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
O केंद्र असलेल्या वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे. जर A चे निर्देशक (0, 2) असतील तर बिंदू (1, 2) हा वर्तुळावर आहे किंवा नाही पडताळा घ्या.
