हिंदी

Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] Official Board Paper 2025-2026 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 9th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
  2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
  3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
  4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल त्यालाच गुण दिले जातील.
  5. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी.
  6. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात त्या पुसू नयेत.
  7. प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे.

[4]1. (A) | पुढील प्रत्येक उपप्रश्‍नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर निवडून लिहा:
[1]1. (A) (1)

खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?

(1, 5, 10)

(3, 4, 5)

(2, 2, 2)

(5, 5, 2)

Concept: undefined - undefined
Chapter: [2] पायथागोरसचे प्रमेय
[1]1. (A) (2)

दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 5 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ______ आहे.

4 सेमी

5 सेमी

1 सेमी

9 सेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (A) (3)

खालीलपैकी ______ हा बिंदू X - अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.

(-2, 0)

(0, 2)

(2, 3)

(2, 0)

Concept: undefined - undefined
Chapter: [5] निर्देशक भूमिती
[1]1. (A) (4)

5 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ ______ आहे.

10 घ.सेमी

100 घ.सेमी

125 घ.सेमी

25 घ.सेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (B) | खालील उपप्रश्न सोडवाः
[1]1. (B) (1)

दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] समरूपता
[1]1. (B) (2)

एका चौरसाचा कर्ण `10sqrt2` सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] पायथागोरसचे प्रमेय
[1]1. (B) (3)

वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप 70° आहे, तर त्याच्या संगत विशालकंसाचे माप काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (B) (4)

एका रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी 45° मापाचा कोन तयार केला असेल, तर त्या रेषेचा चढ काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणत्याही दोन):
Advertisements
[2]2. (A) (1)

खालील आकृतीमध्ये, रेख PS हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा PR ही वृत्तछेदिका आहे. जर PQ = 3.6, QR = 6.4, तर PS काढा.

कृती:

PS2 = `square` × PR (स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)

= PQ × [PQ + QR]

= `square` × [3.6 + 6.4]

= 3.6 × `square`

∴ PS2 = 36

PS = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (A) (2)

जर sec θ = `25/7`, तर tan θ ची किंमत काढा.

उकल:

1 + tan2 θ = `square`

∴ 1 + tan2 θ = `square`2

∴ tan2 θ = `625/49` − `square`

= `(625 - 49)/49`

tan2 θ = `576/49`

tan θ = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (A) (3)

खालील आकृतीत, ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेमी आहे. D हे केंद्र मानून DA त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी D-AXC आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा:

उकल:

चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)2

= (7)2

∴ चौरसाचे क्षेत्रफळ = `square` चौसेमी

जर वर्तुळपाकळी (D-AXC) चे क्षेत्रफळ = 38.5 चौसेमी

तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ = `square` चे क्षेत्रफळ − `square` चे क्षेत्रफळ

= 49 चौसेमी − 38.5 चौसेमी

= `square` चौसेमी

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]2. (B) | खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही चार):
[2]2. (B) (1)

आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [1] समरूपता
[2]2. (B) (2)

ΔRST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] पायथागोरसचे प्रमेय
[2]2. (B) (3)

खालील आकृतीमध्ये जीवा MN आणि RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. जर RD = 15, DS = 4, MD = 8, तर DN = किती?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]2. (B) (4)

P(0,6) आणि Q(12,20) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] निर्देशक भूमिती
[2]2. (B) (5)

सिद्ध करा की, sin2 θ + cos2 θ = 1.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]3. (A) | खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा (कोणतीही एक):
[3]3. (A) (1)

खालील आकृतीमध्ये रेख XY || बाजू AC. जर 2AX = 3BX आणि XY = 9, तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

2AX = 3BX

∴ `"AX"/"BX" = 3/2`

∴ `"AX + BX"/"BX" = (square + square)/2`   ...(योग क्रिया करून)

`"AB"/"BX" = square/2`

ΔBCA ∼ ΔΒΥΧ   ...(समरूपतेची `square` कसोटी)

∴ `"BA"/"BX" = "AC"/"XY"`   ...(समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू)

∴ `5/square = "AC"/9`

∴ AC = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[3]3. (A) (2)

खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

उकल:

AB = BC   ...`square`

∴ ∠BAC = `square`

∴ AB = BC = `square` × AC

= `1/sqrt2` × `square`

= `1/sqrt2` × 2 × `square`

AB = BC = `square`

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]3. (B) | खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन):
[3]3. (B) (1)

खालील प्रमेय सिद्ध करा:

वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात.

Concept: undefined - undefined
Chapter: [3] वर्तुळ
[3]3. (B) (2)

केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] भौमितिक रचना
[3]3. (B) (3)

जर P बिंदू हा A(−1, 7) आणि B(4, −3) यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 : 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] निर्देशक भूमिती
[3]3. (B) (4)

एका शंकूछेदाच्या आकाराच्या बादलीची उंची 28 सेमी आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 12 सेमी व 15 सेमी आहेत, तर बादलीमध्ये किती लीटर पाणी मावेल? `(pi - 22/7)`

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]4. | खालील उपप्रश्न सोडवा (कोणतेही दोन):
[4]4. (1)

ΔΑBC ~ Δ ADE,

ΔABC मध्ये, AB = 6.3 सेमी, ∠CAB = 50°, AC = 5.6 सेमी आणि `"AB"/"AD" = 7/5`, तर ΔADE काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (2)

एका गोलाचे पृष्ठफळ व एका घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे. तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ यांचे गुणोत्तर `sqrt6 : sqrtpi` दाखवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (3)

ΔABC मध्ये, A-X-B आणि A-Y-C असे आहेत की, रेख XY || बाजू BC तसेच रेख XY मुळे ΔABC चे दोन समान क्षेत्रफळात विभाजन होते. तर `"BX"/"AB"` काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. | खालील उपप्रश्न सोडवा (कोणताही एक):
[3]5. (1)

रेख PQ ही एका वर्तुळाची जीवा असून कंस PXQ हा विशालकंस व कंस PYQ हा लघुकंस आहे. ∠POQ हा केंद्रीय कोर आहे.

  1. दिलेल्या माहितीवरून आकृती काढा.
  2. ∠PXQ व ∠PYQ यांची मापे मोजा आणि ∠PXQ व ∠PYQ यांच्या मापांची बेरीज करा. 
  3. ∠POQ चे माप काढा. ∠PXQ व ∠POQ यांच्यामधील संबंध लिहा.
Concept: undefined - undefined
Chapter:
[3]5. (2)

दोन गरुड जमिनीपासून `10sqrt3` मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा त्या गरुडाकडे पाहत असतांना अनुक्रमे 60° व 30° मापाचे उन्नत कोन तयार होतात, तर त्या दोन गरुडांमधील अंतर काढा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×