Important Questions [12]
- दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो.
- खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा. १९८० च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.
- खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. चीन व भारताचा वाढता प्रभाव - बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय, वांशिक राष्ट्रवाद - स्वयंनिर्णयाचे तत्त्व, युरोपीय संघातील चलन - डॉलर
- आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली; कारण ______.
- आपले मत नोंदवा. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.
- गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. सार्कची सदस्य राष्ट्रे : भारत, नेपाळ, श्रीलंका, चीन.
- मास्त्रीक्त करार संदर्भ ______.
- प्रादेशिकवादाचा विकास झाला; कारण ______.
- आज युरोपीय संघातील ______ देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत.
- खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट
- खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही तीन देशांची नावे लिहा.
- ब्रिक्स संघटनेत २०१० साली _______ या देशाचा समावेश झाला.
