Advertisements
Advertisements
Question
‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.
Advertisements
Solution
व्हेनिस या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. फक्त प्रचंड मोठ्या आकाराचे कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आहेत, त्यामुळे या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावरची धक्काबुक्कीही नाही. या सर्व गोष्टी असणारे जगातले हे एकमेव शहर आहे. खरे म्हणजे रूढ अर्थाने हे शहरच नव्हे, तर हा अनेक छोट्या बेटांचा पुंजका आहे, जो दुरून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा दिसतो. येथे वाहनांची नव्हे, तर नावांची ये-जा असते. किनाऱ्यावरून संथपणे सरकणाऱ्या प्रवाशांच्या नावांची येथे वर्दळ असते. कोणालाही कसलीच घाई-गर्दी नसते, त्यामुळे हे शहर म्हणजे निवांतपणा, उत्साह व उत्सव असल्याचे लेखकास वाटते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
टीप लिहा.
गेंड्याच्या सवयी
टीप लिहा.
गायबगळे
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
टिपा लिहा.
व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन
खालील मुद्द्याच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.
व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर
खालील संकल्पना स्पष्ट करा.
व्हेनिस म्हणजे अद्भुत शहर...
तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
खालील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा.
(१) ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
(२) एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण....’
(३) तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक(देशभक्त).
(४) ‘सुधारक’ चे संपादक.
(५) कवी यशवंत यांचे आडनाव.
(६) विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचे आडनाव.
(७) मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
(८) कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

टीप लिहा.
विश्वकोशाचा उपयोग-
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते’, याविषयी तुमचे मत लिहा.
विश्वकोश पाहण्याचे तुम्हांला लक्षात आलेले फायदे लिहा.
केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
खालील कोडे सोडवा व त्याच्या शेवटच्या रकान्यातील वर्णांचे विशेष ओळखा.
(१) पैसे न देता, विनामूल्य.
(२) पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
(३) जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
(४) रहस्यमय.
(५) खास महाराष्ट्रीयन पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
| (१) | |||
| (२) | × | ||
| (३) | |||
| (४) | × | ||
| (५) |
