Advertisements
Advertisements
Question
वास्को-द-गामा हा ______ या देशाचा दर्यावर्दी होता.
Options
पोलंड
इंग्लंड
फ्रान्स
पोर्तुगाल
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता.
स्पष्टीकरण:
१४९७ मध्ये ४ जहाजे आणि १७० खलाशी घेऊन वास्को-द-गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासात ‘मालिंदी’ या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को-द-गामा कालिकत (कोझीकोडे) बंदरात १४९८ साली पोचला. त्याने कालिकतचा राजा झामोरीन याच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यावर तो पोर्तुगालला परतला. तो पुन्हा दोनदा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्तुगिजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर तो पहिला व्हाईसरॉय झाला. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध त्याच्या प्रयत्नातून सुरू झाले.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - पोर्तुगीज
Is there an error in this question or solution?
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [Page 22]
