English

वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का?

Short Answer
Advertisements

Solution

वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात. त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषी कमी असतात. वाळवंटात पाणी आणि अन्नस्रोत कमी असतात, त्यामुळे परपोषी सजीवांना योग्य वातावरण मिळत नाही. वनस्पतींची कमतरता असल्याने अन्नसाखळी योग्य प्रकारे चालू राहत नाही. वाढीसाठी पोषक घटक उपलब्ध नसल्यामुळे परपोषींचे अस्तित्व मर्यादित असते. समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती-प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 6. इ. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×