English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे,

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

       माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं !' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्‍वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!'' अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

     "दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!'' अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.

(1) उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.      (2)

    1. ............................
    2. ............................

(2) आकृतिबंध पूर्ण करा:        (2)

i. कार्डवर दाखवलेले वजन - ...........

ii.

(3) स्वमत:
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.     (3)

Comprehension
Advertisements

Solution

(1)

  1. 'नाही ती भानगड' आहे.
  2. 'हात दाखवून अवलक्षण' आहे.

(2)

i. कार्डवर दाखवलेले वजन - एकशे एक्क्याऐंशी पौंड

ii.

 

(3) थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी लेखसंग्रह “बटाट्याची चाळ” मधून घेतलेला 'उपास' हा पाठ मध्यमवर्गीय माणसाचा संकल्प आणि त्या संकल्पाची पूर्तता यामधील अंतराचे मजेदार वर्णन मांडतो.
लेखकाने आपले वजन, जे एकशे एक्क्याऐंशी पौंड होते, दोन महिन्यांत पन्नास पौंडांनी कमी करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. आहारशास्त्रावरील पुस्तकांच्या मदतीने त्यांनी प्रोटीनयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थांविषयी समज घेतली. या पदार्थांत अधिक कॅलरीज असल्यामुळे वजन वाढते हे लेखकाला उमगले. त्यांनी काटेकोर आहारव्रत ठरवले आणि त्यानुसार आचरण सुरू केले. आता त्यांच्या डोळ्यांसमोर ताटातल्या प्रत्येक पदार्थात कॅलरीजच दिसू लागल्या. वजन घटविण्यात निपुण लोकही लेखकाला वारंवार सल्ला देऊ लागले.
लेखकाने वजन वाढवणारे पदार्थ जसे की बटाटा, साखर आणि दूध टाळले, तर लिंबाचा रस त्यांना अमृतासारखा वाटू लागला. पायी चालणे, दोरीच्या उड्या मारणे असे व्यायाम प्रकार त्यांनी सुरू केले. अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले.

shaalaa.com
उपास
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___


कारणे शोधा.

बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ...........


‘उपास’ या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

भीष्म प्रतिज्ञा


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा.

बाळसेदार भाज्या


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

असामान्य मनोनिग्रह -


तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.


पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.


'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”

“हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

“बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी.

“मुख्य म्हणजे साखर सोडा.”

“मी सांगू का? मीठ सोडा.”

“लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.”

“तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका.

“दिवसा झोपणं सोडा.”

“खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.”

मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले.

२. आकलन कृती 

कोण ते लिहा.  (०२)

अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे 

आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

  1. उपास हे कोणाचे खास कुरण होते?
  2. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला कोणी सुरुंग लावला?

“उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर तर वाढू दे वजन.” मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षयसंकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.

“लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!”

“इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!”

तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच!

दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

“हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.”

२. आकलन कृती

  1. खालील घटनेचा परिणाम लिहा. (०१)
    घटना: लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली.
    परिणाम: _____
  2. पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. (०१)
    बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

          “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.
          “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”
          “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.”

1. कोण ते लिहा. (2)

  1. नेहमी तिरके बोलणारे - ______
  2. बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे - ______

2. कृती पूर्ण करा. (2)

3. पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण ______.
  2. “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण ______.

         माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

         ‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर.

         ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’

         ‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

         पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले अनुभव कसे सांगितले ते सांग.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×