English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आकृती पूर्ण करा: रेखामावशींची कामे चौकटी पूर्ण करा: (i) दार उघडणारा

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांडयांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?'' हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी  फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.

"अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हायबक्कळ?”'

"सॉरी, मावशी खरंच सॉरी,'' आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं.

  1. आकृती पूर्ण करा:        (2)


  2. चौकटी पूर्ण करा:        (2)
    1. दार उघडणारा - ______
    2. फरशी पुसणाऱ्या - ______
    3. अभिषेकचा आतेभाऊ - ______
    4. स्वच्छतेची भोक्ती - ______
  3. स्वमत:
    'सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा' या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.        (3)
Comprehension
Derivation
Advertisements

Solution



    1. दार उघडणारा - अभिषेक
    2. फरशी पुसणाऱ्या - रेखामावशी
    3. अभिषेकचा आतेभाऊ - सुमित
    4. स्वच्छतेची भोक्ती - स्नेहल
  1. “फूटप्रिन्ट्स” या पाठात डॉ. प्रदीप आवटे यांनी ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत, त्यापैकी सायकलचा वापर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
    पावडे काका खाजगी गाडी वापरून प्रवास करतात, ज्यामुळे पेट्रोल जळते आणि हवेत कार्बन डायऑक्साईड सारखा विषारी वायू मिसळतो. अशा प्रकारे आपणही प्रदूषण वाढवत जागतिक तापमानवाढीला हातभार लावतो, ज्यामुळे उष्माघात, वणवे, अवर्षण यांसारख्या संकटांचा धोका वाढतो. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हाच या समस्येचा उपाय आहे.
    त्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि सायकलचा वापर असे उपाय उपयुक्त ठरतात. सायकलसाठी पेट्रोल किंवा डिझेल लागत नाही; फक्त चाकात हवा भरून ती चालवता येते. कमी अंतरासाठी सायकलचा वापर केल्यास हवेचे प्रदूषण होणार नाही. त्यामुळे लेखकाने सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकल वापरण्याचा सल्ला दिला आहे.
    सायकल चालवणे हा आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात, स्थूलपणा कमी होतो, आणि शरीर सुदृढ व सक्रिय राहते. त्यामुळे, सायकल वापर हा पर्यावरण रक्षण आणि निरोगी आयुष्यासाठी एक सोपा उपाय आहे.

shaalaa.com
फूटप्रिन्टस
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

स्नेहल त्रासली, कारण ______.


कारणे लिहा.

पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.


कारणे लिहा.

रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण ______.


कारणे लिहा.

अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ______


उत्तरे लिहा.

स्नेहलने केलेला निश्चय-


उत्तरे लिहा.

अभिषेकने केलेला निश्चय- 


पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती अभिषेक सुमित स्नेहल पावडेकाका रेखामावशी
स्वभाव          
वैशिष्ट्ये          

‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

१. आकृती पूर्ण करा. (०२)

“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?”

“सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळाव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळावा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! 'एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा', रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं ... पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या... माती धूळा बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले.

“मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो”, सुमितनं सांगितलं.

“सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळयांत भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरला की काय तुम्ही लोक?” बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली.

“मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्ट्स”, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला.

२.

अ) आकृती पूर्ण करा. (०१)

आ) एका वाक्यात उत्तर लिहा. (०१)

सुमितने तयार केलेले ॲप कोणते?

३. स्वमत (०३)

तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कोण ते लिहा. (०२)

अ) रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा – ______

ब) झर्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणार्या – ______

क) स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे – ______

ड) पायाची स्वच्छता बघणारा – ______

“गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत?

रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्ट्स...!” असं म्हणत त्यानं मोबाइलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्ट्स! दि मोस्ट क्लीन फूटप्रिन्ट्स!!'

“वाऽ पाह्यलंत रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्पटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “ह्याऽ हे भलतचं!” रेखामावशींच्या पाायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले.

सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिर्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?”

“त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत....!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया,” त्यांनी पुस्ती जोडली.

२. आकृती पूर्ण करा (०२)

अ)

आ)

३. स्वमत (०३)

जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटते ते तुमच्या शब्दांत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. पोरांना बसने प्रवास करणे आवडत नाही, कारण ______.
  2. आपल्याला झाडं लावावी लागतील, कारण ______.

        ‘‘मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत’’, स्नेहल गहिवरून म्हणाली.

        अभिषेक भारावून म्हणाला, ‘‘माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!’’

        ‘‘खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट’’, अभिषेकचे बाबा म्हणाले.

        रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.

        ‘‘पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी’’, सुमित म्हणाला.

      ‘‘पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील’’, सुमित भरभरून बोलत होता. ‘‘हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!’’ पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आवश्यक आहे. याबाबत तुमचे काय मत आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×