English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

i. आकृती पूर्ण करा. (०१)

लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकांची ऐकू येणारी बोलणी- ______

ii. चौकट पूर्ण करा. (०१)

लेखकाची आस्था ज्या शब्दांबद्दल वाढू लागली ते शब्द- ______

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या  कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पाैंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळयांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

 “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या  उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.

२. कोण ते लिहा.  (०२)

१. लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्वास न ठेवणारी ______

२. लेखकाला डाएटचा सल्ला देणार ______

३. स्वमत कृती (०३)

तुम्ही केलेल्या एखाद्या भीष्मप्रतिज्ञेबद्दल माहिती लिहा.

Long Answer
Advertisements

Solution

१.

  1. लेखकाची 'नाही ती भानगड आहे', 'उगीच हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!'
  2. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये.

२. 

  1. लेखकाची धर्मपत्नी
  2. सोकाजी त्रिलोकेकर

३. मी पाचवीत होतो त्या वर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती येऊ घातली होती. त्यावेळी ठरवले, की मी एकतरी रोपटे लावेन आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेईन. त्यावर्षी वाढदिवसाचा खर्च मी टाळला. त्यातून बाबांच्या मदतीने रोप आणून ते लावले, हा साऱ्या कुटुंबियांसाठी एक आनंदाचा क्षण होता. त्या रोपाला रोज पाणी घालणे, माती ठीक करणे यात एक वेगळेच समाधान मिळू लागले. आपण लावलेल्या त्या रोपट्याचे वर्षभरातच बहरलेले ते रूप पाहून मला खूप आनंद झाला. दर वाढदिवशी असेच एक झाड लावून त्याची निगा राखण्याची भीष्मप्रतिज्ञा मी केली. याचा परिणाम म्हणून आज मी लावलेली पाच झाडे माझ्या अंगणात डौलाने उभी आहेत. त्यांची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ पाहून मन रोज आनंदाने फुलून येते.

shaalaa.com
उपास
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: उपास - कृती क्रमांक:१

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi Kumarbharti (Second Language) [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4.1 उपास
कृती क्रमांक:१ | Q १. अ.

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___


कारणे शोधा.

बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ...........


‘उपास’ या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

भीष्म प्रतिज्ञा


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करा.

बाळसेदार भाज्या


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.


तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.


दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.


पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.


'उपास' या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

          “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.
          “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”
          “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.”

1. कोण ते लिहा. (2)

  1. नेहमी तिरके बोलणारे - ______
  2. बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे - ______

2. कृती पूर्ण करा. (2)

3. पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. लेखकांना ताटातले पदार्थाच्या जागी नुसते ‘कॅलरीज’ दिसू लागल्या, कारण ______.
  2. “तू बटाटा सोड” अशा सल्ला सोकाजींनी लेखकांना दिला, कारण ______.

         माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. ‘‘घोरत तर असता रात्रभर!’’ अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

         ‘‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ- सोकाजी त्रिलोकेकर.

         ‘‘तुला सांगतो मी पंत, ‘डाएट’ कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.’’

         ‘‘हो! ‘म्हणजे कुठं राहाता?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहातो’ म्हणा. ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!’’ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

         पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना वजन कमी करण्याबाबत आलेले अनुभव कसे सांगितले ते सांग.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×