English

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेयआणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेतअधिकारवाणीने म्हणाली-‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसूसोडून दे शेजारच्या तळ्यातनि घेऊन - Marathi

Advertisements
Advertisements

Question

रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

Very Long Answer
Advertisements

Solution

आशयसौंदर्य: 'आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य: आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते - तू रडू नकोस. ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

shaalaa.com
आरशातली स्त्री
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: आरशातली स्त्री - कृती [Page 52]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2.11 आरशातली स्त्री
कृती | Q (५) | Page 52

RELATED QUESTIONS

कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन


कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश


वर्णन करा.

आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-


वर्णन करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.

तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.


जोड्या जुळवा.

'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
(२) आभाळ झुल्यावर झुलणारी (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
(३) देह तोडलेले फूल (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
(४) पारंपरिकतेचे वरदान (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा (उ) मनातले सुंदर भाव

खालील ओळींचा अर्थ लिहा.

स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!


काव्यसौंदर्य.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.


अभिव्यक्ती.

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.


‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.


अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

या ओळीचे रसग्रहण करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
          ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
         देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
        वरदान समजून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×