English

अभिव्यक्ती. ‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

अभिव्यक्ती.

‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.

Very Long Answer
Advertisements

Solution

स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

shaalaa.com
आरशातली स्त्री
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.11: आरशातली स्त्री - कृती [Page 53]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2.11 आरशातली स्त्री
कृती | Q (६) | Page 53

RELATED QUESTIONS

कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन


कृती करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश


वर्णन करा.

आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-


वर्णन करा.

आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.

तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.


खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.


जोड्या जुळवा.

'अ' गट

‘ब’ गट

(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
(२) आभाळ झुल्यावर झुलणारी (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
(३) देह तोडलेले फूल (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
(४) पारंपरिकतेचे वरदान (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा (उ) मनातले सुंदर भाव

खालील ओळींचा अर्थ लिहा.

माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!


खालील ओळींचा अर्थ लिहा.

स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!


काव्यसौंदर्य.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.


रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’


‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.


अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

या ओळीचे रसग्रहण करा.


खालील ओळींचा अर्थ लिहा:

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
          ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
         देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
        वरदान समजून


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×