English

थोडक्यात उत्तरे लिहा. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Questions

थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तीचा जीवनप्रवास जाणून घेता येतो. दोन व्यक्तींच्या संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मुलाखतीत रसिकांना गुंगवून ठेवण्याचे कौशल्य मुलाखतकाराकडे असणे अपरिहार्य असते. मुलाखत घेताना काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक असते. मुलाखतदात्याला सहज, सोपे प्रश्न विचारणे गरजेचे असते. मुलाखतदात्याला अधिकाधिक बोलते करण्याचा प्रयत्न मुलाखतकाराने करणे अपेक्षित असते. मुलाखतदात्याचा अवमान होईल, उत्तर देताना संभ्रमाची स्थिती निर्माण होईल असे प्रश्न टाळावेत. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली बनवणे केव्हाही उचित ठरते. अपेक्षित उत्तर सूचित होईल असेच प्रश्नांचे स्वरूप असावे. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मुलाखत घेताना प्रश्नांची निवडही तितकीच महत्त्वाची असते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी. प्रश्नांची निवड करताना उपस्थित श्रोतृवर्ग लक्षात घेणे गरजेचे असते. मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न टाळावे. ज्याद्वारे तणाव, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे उपस्थित करू नये. मुलाखत प्रवाही होईल अशा पद्धतीने संवाद साधत राहावे. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.

shaalaa.com
मुलाखत
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.01: मुलाखत - कृती (२) [Page 91]

RELATED QUESTIONS

खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.

मुलाखतीची पूर्वतयारी.


खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.


थोडक्यात उत्तरे लिहा.

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.


थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:

मुलाखतदात्याचे कार्य.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:

प्रश्नांची निर्मिती


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

भाजीवाला


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:

पोस्टमन


पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.


मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:

मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा:

योग्य समारोप ______ वेळेचे भान ______ थांबणे म्हणजे कळसाध्याय ______ अनपेक्षित व समर्पक समारोप ______ यशस्विता ______ श्रोत्यांचा प्रतिसाद.


मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.


मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.

मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती


मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.

भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.


बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.


एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.

मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्‍नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×