English

थोडक्यात टिपा लिहा: ब्रिटिश वखार - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

थोडक्यात टिपा लिहा:

ब्रिटिश वखार

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. कंपनीने भारतात वखारी (मालाची खरेदी-विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे केंद्र) स्‍थापन करण्याचा निर्णय घेतला. अशा वखारीला ‘फॅक्‍टरी’ आणि नोकरांना ‘फॅक्‍टर्स’ म्‍हणत असत.
  2. १७ व्या शतकाच्या उत्‍तरार्धात कंपनीचा कारभार सुरत आणि चेन्नई (मद्रास) येथून चालत असे. चेन्नईच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्वकिनारा, ओडिशा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते.
  3. सुरतेच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठारप्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत. त्‍यांच्या जोडीला धर्मगुरु, सर्जन व मदतनीस, स्‍वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत.
  4. इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्‍थाने, कार्यालय यासाठी ही जागा असे. वखारीवर इंग्रजांचा झेंडा (पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस) असे. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ-तांदुळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे. मनोरंजन किंवा नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टण, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा उभारल्‍या होत्‍या.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×