Advertisements
Advertisements
Question
‘स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले’, या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा.
Advertisements
Solution
सक्कर नगरपाल्लिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळीलं एका डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. यामुळे वाळू मिश्रित गढूळ पाणी नागरिकांना पुरवले जाई. सक्करवासीयांना असे गढूळ पाणी सोसवत नव्हते. अशा परिस्थितीत विश्वेश्वरय्या यांनी हे आव्हान स्वीकारले त्यांनी अत्यंत कमी खर्चात नदीच्या काठाजवळ पात्रात एक खोल विहीर खोदली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहापर्यंत एक बोगदा खणला. यामुळे नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. त्यामुळे सक्करकरांची घाणेरड्या पाण्यापासून मुक्तता झाली. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
समर्पक उदाहरण लिहा.
विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम -
समर्पक उदाहरण लिहा.
माणुसकीचे दर्शन -
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली.
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे.
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले.
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले.
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
वयाच्या नव्वदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते.
खालील वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होताे ते लिहा.
सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली.
माहिती लिहा.

खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा.
He is an engineer of integrity, character and broad outlook.
‘विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हांला होणारा बोध लिहा.
विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दांत वर्णन करा.
‘झिजलात तरी चालेल पण गंजू नका’, या विचारातून तुम्हांला मिळालेला संदेश सविस्तर लिहा.