English

समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.

Advertisements
Advertisements

Question

समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.

Sum
Advertisements

Solution

पक्ष: `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.

साध्य: `square`PQRS हा आयत आहे.

सिद्धता:

`square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.     ...(पक्ष)

∠ADC + ∠BCD = 180°     ...(समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात.)

दोन्ही बाजूंना `1/2` ने गुणून,

`1/2` ∠ADC + `1/2` ∠BCD = `1/2xx180°`      ...(i)

पण,

`1/2` ∠ADC = ∠PDC      ...(किरण DP हा ∠ADC चा दुभाजक आहे.)   ...(ii)

आणि `1/2` ∠BCD = ∠PCD     ...(किरण CP हा ∠BCD चा दुभाजक आहे.)   ...(iii)

∴ ∠PDC + ∠PCD = 90°      ...[(i), (ii) आणि (iii) वरून]   ...(iv)

ΔPDC मध्ये,

∠PDC + ∠PCD + ∠DPC = 180°    ...(त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.)

∴ 90° + ∠DPC = 180°       ...[(iv) वरून]

∴ ∠DPC = 180° – 90°

∴ ∠DPC = 90°

म्हणजेच ∠SPQ = 90°     ...(D-S-P, P-Q-C)   ...(v)

याचप्रमाणे, आपण सिद्ध करू शकतो, की ∠SRQ = 90°     ...(vi)

तसेच, ∠ASD = 90° आणि ∠BQC = 90°     ...(vii)

∠PSR = ∠ASD     ...(शिरोबिंदू कोन)

∴ ∠PSR = 90°     ...[(vii) वरून]    ...(viii)

तसेच, ∠PQR = 90°     ...(ix)

`square`PQRS मध्ये,

∠SPQ = ∠SRQ = ∠PSR = ∠PQR = 90°     ...[(v), (vi), (viii) आणि (ix) वरून]

∴ `square`PQRS हा आयत आहे.

shaalaa.com
आयताचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: चौकोन - सरावसंच 5.2 [Page 67]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 चौकोन
सरावसंच 5.2 | Q 4. | Page 67
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×