English

शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?

Answer in Brief
Advertisements

Solution

शीतयुद्धाची अखेर होण्यास खालील बाबी कारणीभूत ठरल्या.

  1. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.
  2. सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
  3. पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
  4. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत रशियामधील सर्वांत मोठा देश होता.
shaalaa.com
शीतयुद्धाचा शेवट
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×