English

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?

Answer in Brief
Advertisements

Solution

शीतयुद्ध संपल्यानंतर जागतिक राजकारणात जे मोठे बदल झाले ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.
  2. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार-कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला.
  3. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले.
  4. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.
  5. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
shaalaa.com
शीतयुद्धानंतरचे जग
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×