English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. (1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (i) पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते. (ii) निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (2)

  1. पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
  2. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
  3. स्टेशन इथून खूप दूर होतं.
  4. पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.

रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती.

निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या.

(2) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(3) स्वमत. (3)

तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.

Comprehension
Advertisements

Solution

(1)

  1. चूक
  2. बरोबर
  3. बरोबर
  4. चूक

(2)

(3) माझ्या मते शिक्षणाची, ज्ञानाची आवड असणे हे खऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम लक्षण आहे. त्यासाठी नम्रता हा गुण अंगी बाणवणे अत्यावश्यक आहे कारण ‘विद्या विनयेन शोभते’. तसेच आपल्या शिक्षकांचा मानसन्मान राखणे, आपल्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा आदर करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. कष्टाळू व मेहनती वृत्ती, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड, प्रयोगशील दृष्टी, तर्कशुद्ध विचार करण्याची, सत्य-असत्य, चांगलं-वाईट ओळखण्याची कुवत महत्त्वाची आहे. आपल्या बरोबरीच्या, तसेच लहानांच्या मतांना किंमत देण्याची वृत्ती, सामाजिक भावना, समाजसेवेची आवड, देशाप्रती निष्ठा व देशाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची इच्छा असे अनेक गुण आदर्श विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

shaalaa.com
खरा नागरिक
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


खालील घटनांचे परिणाम लिहा. 

घटना परिणाम
(१) निरंजनच्या आई-वडिलांचे निधन  
(२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.  

निरंजनची दिनचर्या लिहा.

निरंजनची दिनचर्या
_________________________
_________________________
_________________________
_________________________
↓ 
_________________________

निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

स्वप्नाळू-


निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

तार्किक विचार करणारा-


निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

संवेदनशील-


‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.


तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. शब्दजाल पूर्ण करा. (०२)

१. ______

२. ______ स्टेशनवर गेल्याने निरंजनचे होणारे नुकसान

३. ______

४. ______

मावशीचं घर गावाबाहेर डोंगरपायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची; परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं-येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात; पण दुसरा ठेचकाळून जिवाला मुकतो त्याचं काय! असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावेत. आता नऊ पन्नासची गाडी येईल. धाड्धाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं? रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. 

२. आकलन कृती 

  १. चूक की बरोबर ते लिहा. (०१)

  1. मावशीचे घर गावाबाहेर होतं.
  2. निरंजन स्टेशनबाहेर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते.

  २. चौकट पूर्ण करा. (०१)

निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला -

१ ______ २ ______

३. स्वमत (०३)

आपण जे शिकलो ते आपण आचरणात आणले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचे मत स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृती पूर्ण करा. (०२)

अ)

ब)

फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळया सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकलन कृती 

 १. कृती पूर्ण करा. (०२)

i. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले -

१. ______ २. ______ ३.______ ४. ______

ii. उदास मनाने घरी परतणारा - ______

३. स्वमत (०३)

कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते. आपले मत व्यक्त करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) कोण, ते लिहा: (2)

  1. निरंजनचा सर्व खर्च करणारे -
  2. निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला -
         मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की ‘जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.’ गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता.

(2) का ते लिहा: (2)

  1. निरंजन वार लावून जेवायचा, कारण ______
  2. निरंजन झटून अभ्यास करायचा, कारण ______

(3) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा. (3)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
  2. गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______

          निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली.

          फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×