English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृती पूर्ण करा. (०२)

अ)

ब)

फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळया सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकलन कृती 

 १. कृती पूर्ण करा. (०२)

i. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले -

१. ______ २. ______ ३.______ ४. ______

ii. उदास मनाने घरी परतणारा - ______

३. स्वमत (०३)

कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते. आपले मत व्यक्त करा.

Long Answer
Advertisements

Solution

१.

अ)

ब)

२.

i. १. जिल्हाधिकारी       २. जिल्हा पोलीस अधीक्षक

  ३. सारे अधिकारी       ४. स्टेशनमास्तर

ii. निरंजन

३. निरंजनप्रमाणे नि:स्वार्थीपणे इतरांच्या हिताचे काम करताना अनेक वेळा आपल्याला स्वत:ला नुकसान सहन करावे लागते; मात्र हे नुकसान बाजूला सारून त्या क्षणी इतरांच्या हिताच्या विचाराला प्राधान्य देण्यात खरी उदारता असते. बऱ्याच वेळा आपण आपला कार्यभार आटोपताना समोरची व्यक्ती संकटात सापडते. हे संकट मोठे आहे, त्याने त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होऊ शकते याची जाणीव होणे व त्या जाणिवेतून त्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा होणे हे नि:स्वार्थीपणाचे लक्षण आहे. अशा नि:स्वार्थी भावाने केलेली मदत, सेवा हीच खरी ईश्वरसेवा असते. अशा वेळी आपल्या कामात आपले नुकसान होऊनही ते मान्य करून पुढे जाण्याची वृत्ती महत्त्वपूर्ण ठरते. 

shaalaa.com
खरा नागरिक
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: खरा नागरीक - कृती क्रमांक:५

APPEARS IN

SCERT Maharashtra Marathi (Second Language) 10 Standard SSC
Chapter 15 खरा नागरीक
कृती क्रमांक:५ | Q १. अ.

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


खालील घटनांचे परिणाम लिहा. 

घटना परिणाम
(१) निरंजनच्या आई-वडिलांचे निधन  
(२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.  

निरंजनची दिनचर्या लिहा.

निरंजनची दिनचर्या
_________________________
_________________________
_________________________
_________________________
↓ 
_________________________

निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

स्वप्नाळू-


निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

तार्किक विचार करणारा-


निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारे वाक्य शोधा.

संवेदनशील-


‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.


तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कोष्टक पूर्ण करा

निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा, नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला, की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच.

पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे.

निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला - 'रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.'

२. आकलन कृती 

 १. कारण लिहा. (०१)

 निरंजन हा भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता, कारण - ______

 २. खालील दोन गोष्टींसाठी परिच्छेदात आलेला एक शब्द म्हणजे - (०१)

या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली ______

हा विषय जरा अवघड होता ______

३. स्वमत (०३)

निरंजनचा मामा त्याच्याशी कसा वागला हे परिच्छेदाच्या आधारे लिहा. 


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
  2. गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______

          निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली.

          फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (2)

  1. पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
  2. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
  3. स्टेशन इथून खूप दूर होतं.
  4. पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.

रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती.

निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या.

(2) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(3) स्वमत. (3)

तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×