English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.

Long Answer
Advertisements

Solution

पुस्तके नि:स्वार्थी मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यास अनेक फायदे होतात. हे मित्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपल्या अस्तित्वाने ते सर्वांचाच एकटेपणा दूर करतात. त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. ती फक्त स्वत:जवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला करून देतात. आपले मनोरंजन करून जीवनातील तोचतोचपणा, रटाळपणा दूर करतात. चांगले विचार, मूल्ये, संस्कार वाचकांना पुरवतात. आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात. ही पुस्तके आपले अनुभवविश्व संपन्न करतात. आपल्याला ‘माणूस’ म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन मिळतात. विचारांना, लेखनाला चालना मिळते, आनंद मिळतो, म्हणूनच वाचकाला आयुष्यभर भरभरून देणारी पुस्तके ही उत्तम मित्र असतात. पुस्तके वाचल्याने आपली कल्पनाशक्ती वाढते आणि आपण अधिक सर्जनशील बनतो. चांगली पुस्तके आपल्याला महान गोष्टी करण्यासाठी आणि अपयशांवर मात करण्यासाठी प्रेरणा देतात. पुस्तके आपल्याला सोबत देतात आणि कठीण काळात सांत्वन देतात, ज्यामुळे मन शांत होते. पुस्तके वाचून आपण इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेतो, ज्यामुळे आपली सामाजिक व भावनिक समज वाढते. वाचन हा मनाचा एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे आपले मन तल्लख आणि सक्रिय राहते. वाचनातून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि जीवनात प्रगती करता येते.

आपल्याला ज्ञान समृद्ध व
अनुभव संपन्न बनवतात. म्हणून
“पुस्तके वाचू या...
जीवनाकडे सखोलतेने बघू या!”

shaalaa.com
रंग साहित्याचे
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: रंग साहित्याचे - कृती [Page 40]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 10 रंग साहित्याचे
कृती | Q (७)(अ) | Page 40

RELATED QUESTIONS

'रंग साहित्याचे' या पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


फरक स्पष्ट करा.

चरित्र आत्मचरित्र
   

तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.


‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


तुम्हांला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्‌द्यांचा विचार करून माहिती लिहा.

(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्यविषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1.  इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकवणारी - ______
  2. “आपण ‘साहस कथा’ शिकूया” म्हणणारी - ______
सुश्रुत: तुम्ही सगळे कोण आहात?
कथा: अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव.
सुश्रुत: आपली ओळख कशी काय?
कथा: आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हांला मला वाचायची सवय लागते ना!
सुश्रुत: होऽऽ आता आठवलं आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.
कथा: बरं का सुश्रुत! आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये.
सुश्रुत: तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, ‘‘आपण ‘साहस कथा’ शिकूया.’’
कथा: अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य.
सुश्रुत: तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना-

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

तुम्हाला आवडलेल्या ललितकलेबद्दल तुमचे मत सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×