Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
Advertisements
Solution
- चित्रकथी या प्राचीन चित्रकला परंपरेत कठपुतळ्या किंवा चित्रांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या जातात.
- इसवी सनाच्या बाराव्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे, ज्यावरून या परंपरेची प्राचीनता स्पष्ट होते.
- या चित्रकलेत चित्रे कागदावर काढली जातात आणि नैसर्गिक रंगांनी रंगवली जातात. प्रत्येक कथेसाठी साधारणतः ३० ते ५० चित्रांचा वापर केला जातो.
- विविध कथा सांगण्यासाठी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या अशा चित्रांच्या पोथ्या चित्रकथी कुटुंबात जपल्या जातात.
त्यामुळे, या सांस्कृतिक परंपरांचे, वारशांचे जतन व संवर्धन व्हावे याकरता चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
RELATED QUESTIONS
चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.
मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
हेमाडपंती शैली
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| मंदिर स्थापत्य शैली | नागर | द्राविड | हेमाडपंती |
| वैशिष्ट्ये | |||
| उदाहरणे |
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:

(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

