Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
Explain
Advertisements
Solution 1
- शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी शासनाने २००५ साली नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.
- या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत.
- शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.
- माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.
shaalaa.com
Solution 2
- नागरिकांना राज्याच्या कामकाजाविषयी आणि निर्णय-प्रक्रियेविषयीची महत्त्वपूर्ण माहिती देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने, ‘माहितीचा अधिकार’ कायदा २००५ मध्ये लागू करण्यात आला.
- या कायद्यामुळे सरकार अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक बनते; तसेच राज्य आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढल्यामुळे परस्पर विश्वास निर्माण होतो.
- यामुळे सरकारच्या कामकाजातील गुप्ततेचे प्रमाण कमी झाले आहे.
- माहितीच्या अधिकारासाठीची (RTI) चळवळ सर्वप्रथम २००० साली महाराष्ट्रात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.
- राज्यस्तरीय प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर, पुढे २००५ मध्ये या चळवळीला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले.
shaalaa.com
लोकशाही
Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संविधानाची वाटचाल - संकल्पना स्पष्ट करा
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
