Advertisements
Advertisements
Question
पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:
राग व्यवस्थापनातील पुनर्मूल्यांकन दृष्टिकोन स्पष्ट करा.
मुद्दे:
- तुमच्या भावनांची जबाबदारी तुम्हीच घ्या
- तदनुभूती निर्माण करा
- करुणा दाखवणे
- वास्तववादी तपासणी करा
Explain
Advertisements
Solution
- तुमच्या भावनांची जबाबदारी तुम्हीच घ्या: तुम्ही तुमच्या भावना व वर्तनाची नेट ओळख करून घेत असल्याने या टप्प्यावर तुम्हाला राग नियंत्रणासाठी उत्तम बळ मिळते. तुम्ही तुमच्या भावना आणि रागाची जबाबदारी घेत आहात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही इतरांच्या भावना राखण्यासाठी किंवा स्वतःची (असलेली/नसलेली) चूक मान्य करत आहात. तुम्ही फक्त तुमच्या विचारांची दिशा बदलत आहात. ज्यामध्ये तुमच्या नेमक्या कोणत्या गरजा अपूर्ण राहिल्यामुळे तुमचा संताप वाढलाय हे शोधत आहात. उदाहरणार्थ जर तुमच्या जीवलग मित्राने तुमच्याशी खोटे बोलून तुम्हाला फसवले तर तुमचा मित्र तुमच्याशी असे का वागला, ते योग्य की अयोग्य याचा विचार न करता तुम्ही नाराज निराश होतात. आता तुम्हाला जाणीव झाली असेल की, मित्राशी तर्कसंगत व योग्य पद्धतीने कसे संबंध ठेवावेत व परिस्थिती कशी हाताळावी.
- तदनुभूती निर्माण करा: इतरांचे अनुभव आपण आपले मानून समजून घेतले तर त्यामुळे इतरांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला होणारा त्रास आणि त्याचा येणारा राग बराच नियंत्रणात आणता येतो. उदाहरणार्थ तुम्ही बिल भरण्यासाठी रांगेत उभे आहात. कोणीतरी मध्येच घुसतो आणि त्याचे बिल भरण्याचा प्रयत्न करतो अशावेळी आपल्याला त्याचा खूप राग येतो. मात्र आपण पण जर का तो तसे का वागत असावा याचा आपल्या मागील अनुभवावरून विचार करतो तेव्हा आठवते की आवडता सिनेमा सुटू नये म्हणून आपणही मागे असेच केले होते तर त्याचे वागणे या परिस्थितीत कसे योग्य आहे हे आपल्याला पटते आणि आपला राग नियंत्रणात राहतो.
- करुणा दाखवणे: प्रत्येक व्यक्ती मनातील भावनिक संघर्षांचा सामना करत असते. तुम्हाला त्यांच्यावर दया दाखवण्याची गरज नाही परंतु हे समजून घेतले पाहिजे की तेही मानव आहेत व व त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे आपण रागाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला फसवणाऱ्या मित्राशी मैत्री तोडण्याचा निश्चय आपण करतो व हे आपल्यासाठी खूप संवेदनशील असते. परंतु आपल्या मित्राविषयी रागाला अधिक तिखट मीठ लावून आपले मैत्रीचे नाते आणखी खराब करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचे वर्तन सहन करण्यास तयार आहात व कोणते नाही याबाबत आपल्या सीमारेषा ठरवा. बाकीच्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे जीवनाचा प्रवास करू द्या व त्यांना स्वतःचे पर्याय निवडून द्या.
- वास्तववादी तपासणी करा: आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत त्याच्या वास्तविकतेचा आढावा घेतल्यास आपल्या रागावर नजर ठेवण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत असाल. काय घडले असेल या परिस्थितीचा ३६० अंशातून विचार केला तर त्यातून आपल्याला संपूर्ण परिस्थितीचे आकलन होते. तसेच त्यांचे परिणाम लक्षात येतात. निर्णय घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला अधिक माहिती प्राप्त केली तर त्या आधारावर योग्य निर्णय घेता येतो किंवा कृती करता येते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
