Advertisements
Advertisements
Questions
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
छिन्नमनस्कतेची कोणतीही दोन धनात्मक लक्षणे स्पष्ट करा.
पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा:
छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे स्पष्ट करा.
मुद्दे:
- विभ्रम
- असंघटित संभाषण
- विचित्र वर्तन
- विसंगत भावना
Explain
Advertisements
Solution 1
छिन्नमनस्कतेची धनात्मक लक्षणे: सर्वसाधारणपणे सामान्य व्यक्तीत आढळून न येणारे लक्षणांना धनात्मक लक्षणे असे म्हणतात. ते पुढीलप्रमाणे -
- विभ्रम: उद्दीपकांच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. यात एखादी गोष्ट समोर अस्तित्वात नसताना त्याचा अनुभव व्यक्तीस होतो. उदा. शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे, तसेच श्रवण भ्रम, गंध भ्रम, स्पर्श भ्रम, शरीर अंतर्गत संवेदना असे व्यक्तीत निर्माण होतात.
- भ्रांती: वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती यांना भ्रांती असे म्हणतात. यात व्यक्तीला कितीही पुरावे दिले तरी ते ती स्वीकारत नाही. उदा. एखादी व्यक्ती मला कट करून मारणार आहे असे वाटणे.
- असंघटीत संभाषण: इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात. मधेंच भलत्याच मुद्द्यावर जातात. निरर्थक शब्दाचा वापर केला जातो.
- विचित्र वर्तन: छिन्नमनस्क व्यक्ती वर्तन विचित्र व विक्षिप्त स्वरूपाचे असते. तासन तास उभे रहाणे, विनाकारण किंचाळणे इकडेतिकडे धावणे. एखाद्यावर हल्ला करणे चावा घेणे, सार्वजनिक ठिकाणी कपडे काढणे इ.
- विसंगत भावना: या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. यांची भावना परिस्थितीशी जुळत नाही विसगती आढळते. उदा. आनंदाच्या प्रसंगात या व्यक्ती ओरडतात तर दुखाच्या प्रसंगात या व्यक्ती मोठमोठ्याने हसतात.
shaalaa.com
Solution 2
- विभ्रम: वास्तविक बाह्य उद्दीपक उपलब्ध नसतानाही होणाऱ्या संवेदनाक्षम अनुभवांना विभ्रम म्हणतात. उदा. प्रत्यक्षात कोणीही नसताना आवाज ऐकू येणे.
- भ्रमिष्टपणा: वास्तवाचा कोणताही आधार नसताना व्यक्तीचा एखाद्या चुकीच्या गोष्टीवर असलेला ठाम विश्वास म्हणजे भ्रमिष्टपणा होय. उदा. स्वतःच्या जिवाला धोका असल्याचा खोटा संशय धरणे.
shaalaa.com
Notes
Students should refer to the answer according to their question.
Is there an error in this question or solution?
