English

पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. पोर्तुगीज - मराठा संघर्षाविषयी माहिती लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

पोर्तुगीज - मराठा संघर्षाविषयी माहिती लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. शिवरायांनी कल्याण व भिवंडी जिंकल्यानंतर मराठ्यांचा पोर्तुगिजांशी प्रथम संबंध आला.
  2. पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या फोंड्याच्या किल्ल्याच्या वेढ्यात आदिलशाही किल्लेदाराला दारूगोळा पुरवला आणि त्या आधी कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातून मराठ्यांची १३ जहाजे पळवून नेल्यामुळे दोन्ही सत्तांत वितुष्ट निर्माण झाले.
  3. पोर्तुगिजांनी चालवलेली सक्तीची धर्मांतरे आणि त्यास पोषक कायदे यामुळे शिवरायांनी त्यांच्या बारदेश प्रांतावर स्वारी केली होती.
  4. मराठ्यांनी सिद्दीच्या दंडा-राजपुरीला वेढा घातला असता, पोर्तुगिजांनी सिद्दीला धान्य व युद्धसाहित्य पुरवून मदत केली.
  5. आदिलशाही - मराठे संघर्षात पोर्तुगीज वरकरणी तटस्थता दाखवून छुपी मदत करत असल्याने शिवरायांनी त्यांची सत्ता समूळ नष्ट करण्याची योजना आखली होती.
  6. तसेच रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे-पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ कायम राहिला.
  7. गोव्यातील जनतेचे होणारे शोषण आणि समुद्री व्यापारातील लुटालूट यांमुळे मराठ्यांनी फोंड्याच्या युद्धात पोर्तुगिजांचा पराभव केला.
  8. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्यासाठी रेवदंडा बंदरावर हल्ला केला आणि पोर्तुगिजांचा फोंडा किल्ल्याचा वेढा मोडून थेट गोव्यावर स्वारी केली; मात्र मुघलांच्या आक्रमणामुळे ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.
  9. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पुन्हा संघर्ष उद्भवून मराठ्यांनी कल्याण-भिवंडीवर ताबा मिळवला.
  10. शेवटी थोरले बाजीराव पेशवे यांनी चिमाजीअप्पा यांच्याकडे मोहिमेची सूत्रे सोपवली; त्यांनी ठाण्याचा किल्ला, साष्टी बेट आणि ऐतिहासिक वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांच्या सत्तेला नमवले.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×