Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
पोर्तुगीज - मराठा संघर्षाविषयी माहिती लिहा.
विस्तार में उत्तर
Advertisements
उत्तर
- शिवरायांनी कल्याण व भिवंडी जिंकल्यानंतर मराठ्यांचा पोर्तुगिजांशी प्रथम संबंध आला.
- पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या फोंड्याच्या किल्ल्याच्या वेढ्यात आदिलशाही किल्लेदाराला दारूगोळा पुरवला आणि त्या आधी कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातून मराठ्यांची १३ जहाजे पळवून नेल्यामुळे दोन्ही सत्तांत वितुष्ट निर्माण झाले.
- पोर्तुगिजांनी चालवलेली सक्तीची धर्मांतरे आणि त्यास पोषक कायदे यामुळे शिवरायांनी त्यांच्या बारदेश प्रांतावर स्वारी केली होती.
- मराठ्यांनी सिद्दीच्या दंडा-राजपुरीला वेढा घातला असता, पोर्तुगिजांनी सिद्दीला धान्य व युद्धसाहित्य पुरवून मदत केली.
- आदिलशाही - मराठे संघर्षात पोर्तुगीज वरकरणी तटस्थता दाखवून छुपी मदत करत असल्याने शिवरायांनी त्यांची सत्ता समूळ नष्ट करण्याची योजना आखली होती.
- तसेच रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे-पोर्तुगीज यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ कायम राहिला.
- गोव्यातील जनतेचे होणारे शोषण आणि समुद्री व्यापारातील लुटालूट यांमुळे मराठ्यांनी फोंड्याच्या युद्धात पोर्तुगिजांचा पराभव केला.
- छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्यासाठी रेवदंडा बंदरावर हल्ला केला आणि पोर्तुगिजांचा फोंडा किल्ल्याचा वेढा मोडून थेट गोव्यावर स्वारी केली; मात्र मुघलांच्या आक्रमणामुळे ही मोहीम अर्धवट सोडावी लागली.
- छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पुन्हा संघर्ष उद्भवून मराठ्यांनी कल्याण-भिवंडीवर ताबा मिळवला.
- शेवटी थोरले बाजीराव पेशवे यांनी चिमाजीअप्पा यांच्याकडे मोहिमेची सूत्रे सोपवली; त्यांनी ठाण्याचा किल्ला, साष्टी बेट आणि ऐतिहासिक वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगिजांच्या सत्तेला नमवले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
