Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत लिहा.
पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
देशाच्या विकासात पर्यटन स्थळांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे महत्त्व प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
- पर्यटन स्थळे हा आपल्या देशाचा अनमोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचा ठेवा आहे.
- आपले ऐतिहासिक किल्ले, वास्तू, लेणी आणि समृद्ध निसर्ग हे आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात; हे वैभव पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक भारतात येतात.
- आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते, जे अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
- पर्यटनामुळे हजारो व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतात.
- स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. कला उदयोगांना चालना मिळते, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था अधिक विकसित आणि सक्षम होते.
- पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही. ती प्रत्येकानेच घेतली पाहिजे. अन्यथा वरील सर्व पर्यटनाचे फायदे आपल्याला व देशाला होणार नाहीत.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - पर्यावरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
