English

पुढील मुद्द्यांच्या आधारे नोकरीसाठी व प्रवेशासाठी आलेल्या उमेदवाराला 'आतून' जाणून घेणे गरजेचे असते हे स्पष्ट करा: बोद्‌धिक क्षमता - ज्ञानाची पातळी - जीवनविषयक दृष्टिकोन - निर्णयक्षमता - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील मुद्द्यांच्या आधारे नोकरीसाठी व प्रवेशासाठी आलेल्या उमेदवाराला 'आतून' जाणून घेणे गरजेचे असते हे स्पष्ट करा:

बोद्‌धिक क्षमता - ज्ञानाची पातळी - जीवनविषयक दृष्टिकोन - निर्णयक्षमता - भाषेवरील प्रभुत्व - गटनेतृत्व - यशाचे श्रेय.

Explain
Advertisements

Solution

आधुनिक काळात नोकरीसाठी तसेच विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुलाखत हा महत्त्वाचा घटक मानला जातो. बदलत्या काळात उमेदवाराची पदवी, विषयज्ञान, भाषिक कौशल्ये यांसोबतच उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व केंद्रस्थानी आले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये उमेदवाराजवळ आहेत का, याची चाचपणी केली जाते. उदा., विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न प्रथमतः केला जातो. कंपनीचे अपेक्षित उद्दिष्ट, कामाचे तास, सहकाऱ्यांशी असणारे मैत्रिपूर्ण संबंध, गटप्रमुख वा गटकार्यांची क्षमता, कामाची विभागणी, वेळेचे बंधन, नियोजित बैठका, समूह-सदस्यांचे प्रश्‍न, प्रसंगी करावे लागणारे समुपदेशन इत्यादी अनेक बाबी नजरेसमोर ठेवून उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. सहकाऱ्यांच्या भावना, विचार, सूचना, समस्या यांबद्दल उमेदवाराकडे असलेली स्वीकारशील वृत्ती आणि मार्ग काढण्याची तत्परता, विवेकबुद्धी, प्रसंगावधान अशा गोष्टींना मुलाखतीत महत्त्व दिले जाते. मुलाखतीला आलेला उमेदवार दिसतो कसा, बोलतो कसा यापेक्षा 'विचार कसा करतो ' याकडे अधिक लक्ष दिले जाते. उमेदवार भावनिक, वैचारिक, मानसिक पातळ्यांवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवाराच्या 'बाह्यरंगा' पेक्षा 'अंतरंग' जाणून घेणे आवश्यक असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×